आर्या राजेंद्रन, अवघ्या 21 वर्षाची महापौर!

| Updated on: Jan 15, 2021 | 7:53 PM

आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी तिरुवनंतपुरमची नगरसेवक म्हणून विजयी झाली असून ती महापौर होणार आहे. Arya Rajendran Devendra Fadnavis

आर्या राजेंद्रन, अवघ्या 21 वर्षाची महापौर!
Follow us on

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती देशातील सर्वात तरुण महापौर ठरणार आहे.  (Kerala Arya Rajendran will became youngest mayor)

आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे.

आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयन तर आई एलआयसी एजंट

आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

केरळमधील स्थानिक निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीनं मोठा विजय मिळवला आहे. 10 जिल्हा परिष, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफला विजय मिळवला आहे. तर भाजपनं 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.

आर्या राजेंद्रन केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमची महापौर होणार आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

कोरोनाची लस मोफत देण्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

(Kerala Arya Rajendran will became youngest mayor )