AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate: LPG, CNG महागलं, आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्या? आजचा भाव जाणून घ्या…

Petrol Diesel Rate Today: महिन्याची सुरुवात मध्यमवर्गीयांसाठी महागाईच्या झटक्याने झाली आहे. आता पेट्रोल डिझेलच्या किमतीतलही वाढ झाली आहे की नाही पाहा.

Petrol Diesel Rate: LPG, CNG महागलं, आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्या? आजचा भाव जाणून घ्या...
| Updated on: Sep 01, 2026 | 7:48 AM
Share

Petrol Diesel Rate: आज एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाल्यानंतर, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या एचपीसीएल (HPCL), आयओसीएल (IOCL) आणि भारत पेट्रोलियमने (Bharat Petroleum) पेट्रोल आणि डिझेलचे दरही जाहीर केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ₹९.५० ने वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा एकदा प्रति बॅरल ९१ डॉलरचा टप्पा ओलांडला असून, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरही जाहीर झाले आहेत.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ०.९१ डॉलरने वाढून ८६.६७ डॉलरवर होता, तर आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल ०.६२ डॉलरने वाढून ९१.११ डॉलरवर होता. मुंबईमध्ये १ सप्टेंबर २०२६ रोजी पेट्रोलचा दर १११.२१ रुपये प्रति लिटर इतका आहे म्हणजे पेट्रोलच्या दरात तरी अजून कोणताच बदल झालेला नाही.  मुंबईत 1 सप्टेंबर 2026 रोजी डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लीटर इतका आहे म्हणजे याचा अर्थ डिझेलच्या किमतीतही कोणताच बदल झालेला नाही.

एलपीजीचे दर काय?

मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹२७०१ आणि घरगुती सिलेंडरची किंमत ₹९४१.५० आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचे किमतीत कोणताचा बदल झाला नाही.

CNG आणि PNG दरात वाढ मध्य पूर्वेतील देशाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय निर्देशांकांशी निगडित इनपुट गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, एमजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली आहे. ही वाढ आजपासून म्हणजे 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहे.

आता महिन्याची सुरुवात ही लोकांसाठी महागाईच्या झटक्याने झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच साखर, दूध, सीएनजी, व्यावसायिक सिलिंडर या सगळ्यांच्या किमतीत थेट मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिना सर्वसामन्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण किमतीत थेट वाढ झाल्याने आता लोकांचे घरगुती बजेट एका झटक्यात वाढले आहेत. लोकांच्या खिशावर मोठा परिणाम पडणार असल्याचे दिसत आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल