Latif Bhatt Encounter : मशिदीतून बाहेर पडताच गोळी घातली, अखेर दहशतवादी लतीफ भटचा खात्मा, सर्वात मोठी कारवाई

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भटला ठार केले. कुलगाम हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेल्या भटने मशिदीत लपून आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला. सुरक्षा दलाच्या या यशस्वी कारवाईमुळे काश्मीरमधील दहशतवादाला मोठा धक्का बसला आहे.

Latif Bhatt Encounter : मशिदीतून बाहेर पडताच गोळी घातली, अखेर दहशतवादी लतीफ भटचा खात्मा, सर्वात मोठी कारवाई
| Updated on: Nov 18, 2026 | 10:54 AM

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कुलमाग हल्ल्याचा मास्टर माइंड, लश्कर ए तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट अखेर मारला गेला आहे. लतीफ भट एका मशिदीत लपला होता. त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आलं होतं. पण त्याने नकार दिला होता. मला अल्लाहकडे जायचं आहे, असं म्हणत त्याने सरेंडर करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सुरक्षा दलाने त्याला टिपण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जेव्हा तो मशिदीतून बाहेर आला, तेव्हा लगेच त्याला गोळ्या घालण्यात आला. त्यात तो ठार झाला. कुलमाममध्ये सुरक्षा दलाने ही मोठी कारवाई केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुलगामचे एसएसपी अनायत अली यांनी या एन्काउंटरची पुष्टी केली आहे. अनायत अली यांनी स्वत: लतीफशी व्हिडीओ कॉलवरून बराचवेळ संवाद साधला होता. त्याला शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. सरेंडर केल्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात येणार नाही, असा विश्वास त्याला दिला होता. पण सुरक्षा दलाचं ऐकलं नाही. अल्लाह शिवाय माझं कोणी नाही. मी अल्लाहकडे जात आहे, असं तो यावेळी म्हणाला.

Loading...

रात्रीच मशिदीत आला

लतीफ रात्री जेव्हा 2.45 वाजता मशिदीत आला तेव्हा गोळीबार करण्यात आला. त्याला बाहेर काढण्यासाठी आधी त्याच्याशी संवाद साधण्यात आला. पण त्याने ऐकलं नाही. त्यामुळे अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. धार्मिक स्थळाला कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. मशिदीत घुसून सुरक्षा दलाने कोणतीही कारवाई केली नाही. तो बाहेर येण्याची वाट पाहिल्या गेली, असं अनायत अली यांनी सांगितलं.

सीमेपलिकडून आदेश

लतीफ भट 18 नोव्हेंबर 2025 रोजी लश्कर ए तोयबामध्ये सामील झाला होता. कथितपणे त्याने स्वत:च कट्टरपंथी व्हायचं ठरवलं होतं. सीमेपलिकडून त्याला जम्मू-काश्मीरमधील सौहार्द, पर्यटन आणि अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचे आदेश देण्यात आले होते.

कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड

लतीफ भट हा कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. हा हल्ला करण्याच्या एक दिवस आधी लतीफ भट आणि दहशतवादी उमर निसार डारने कुलगाम जिल्ह्यातील अनेक संवेदनशील भागांचा दौरा केला होता. या दोघांनी सुरक्षा दलाला टार्गेट करण्याच्या हेतूने मीर बाजार, अखरान, हबलिश आणि किलम सारख्या परिसरात जाऊन रेकी केली होती. या दोघांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या हा प्लान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

रेकी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दहशतवाद्यांनी अखरान परिसरातील सीआरपीएफच्या नाक्यावर अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर हे दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास केला असता त्यामागे लतीफ भट असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सुरक्षा दलाने त्याच्या विरोधात ऑपरेशन सुरू केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us