AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, आकडा ऐकून बसेल धक्का

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मुंबईच्या जुहू परिसरात दोन दिवसांपूर्वी त्याच्या वाहनावर गोळीबार झाला. त्यानंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई चर्चेमध्ये आला आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक, आकडा ऐकून बसेल धक्का
Lawrence BishnoiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 6:52 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मुंबईच्या जुहू परिसरात दोन दिवसांपूर्वी त्याच्या वाहनावर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्या वाहनावर गोळीबार केला. या घटनेतून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. तर अन्य दोन जण जखमी झाले. दरम्यान या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोई हा सध्या जेलमध्ये आहे. त्याला गुजरातमधील साबरमती जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई हा जेलमध्ये राहून देखील आपली गँग ऑपरेट करत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

टायगर श्रॉफ वर झालेल्या हल्ल्यानंतर बिश्नोईचं लो कॉस्ट डिस्पोजेबल शूटर मॉडेल आता जगासमोर आलं आहे. या मॉडेल अंतर्गत अल्पवयीन मुलांना थोडेसे पैसे देऊन आणि परदेशात पाठवण्याचे अमिष दाखवून अशा घटनांसाठी त्याचा उपयोग होत आहे. दरम्यान टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला असून, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, त्याची देखील चर्चा होत आहे.

लॉरेन्स बिश्नोईकडे किती संपत्ती?

लॉरेन्स बिश्नोचा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील हरियाणा पोलीसमध्ये कॉस्टेबल होते. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच त्याचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एकूण 110 एकर शेती आहे. पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यातील दुतारा गावात ही सगळी जमीन आहे. हेच बिश्नोईचं मुळ गाव आहे. तसेच त्याच्याकडे आणखीही काही संपत्ती असल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत स्विकारली जबाबदारी

दरम्यान टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारल्याचं म्हटलं होतं.  जो सलमान खानसोबत काम करेल त्याचे हाल असेच होतील, अशी धमकी देखील देण्यात आली होती.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?