AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिजाब-पगडी चालते पण टिकली नाही? Lenskartच्या नियमांमुळे राज्यात खळबळ, कंपनीने दिले स्पष्टीकरण

Lenskart Dress Code Controversy: लेन्सकार्टच्या कार्यालयातील ड्रेस कोडसंदर्भातील एक कागदपत्र लीक झाल्याने मोठा वाद निर्माण झाला. लोकांनी असा दावा केला की, या कागदपत्रानुसार कार्यालयात टिकली आणि टिळा लावण्यास मनाई होती, तर हिजाब घालण्यास परवानगी होती.

हिजाब-पगडी चालते पण टिकली नाही? Lenskartच्या नियमांमुळे राज्यात खळबळ, कंपनीने दिले स्पष्टीकरण
LenskartImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 16, 2026 | 3:31 PM
Share

Lenskart कंपनीच्या ऑफिस ड्रेस कोडशी संबंधित एक कागदपत्र लीक झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या कागदपत्रांनुसार ऑफिसमध्ये टिकली आणि टिळा लावण्यास परवानगी नाही, मात्र हिजाब घालण्यास परवानगी आहे. या कागदपत्रांमध्ये केलेल्या दाव्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाद वाढताच Lenskartचे संस्थापक आणि CEO पीयूष बंसल यांनी स्पष्ट केले की, हे लीक झालेले कागदपत्र चुकीचा आहे आणि तो कंपनीच्या वर्तमान नियमांना प्रतिबिंबित करत नाही.

Lenskart काय आहे?

Lenskart ही भारतातील चश्मा (आयवेअर) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. ती स्वस्त दरात दर्जेदार चश्मे उपलब्ध करून देते. कंपनी स्वतः फ्रेम आणि लेन्स बनवते. नंतर दलालांना काढून टाकून खर्च कमी करते. २०१९ मध्ये ही स्टार्टअप युनिकॉर्न बनली होती. सध्या कंपनी IPO च्या तयारीत असून, तिचे मूल्यांकन सुमारे 5.6 अब्ज डॉलर इतके असल्याचे सांगितले जाते.

लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये काय होते?

लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये ड्रेस कोडसंबंधीत नियमावली लिहिली होती:

-सिंदूर लावताना तो कमीत कमी लावावा आणि तो कपाळावर पडू नये.

-टिकली लावण्यास परवानगी नाही.

-धार्मिक धागा किंवा मनगटावर घातलेले धार्मिक वस्तू काढून टाकाव्यात.

-हिजाब/पगडी घालताना त्याचा रंग काळा असावा.

-हिजाबने छातीचा मधला भाग झाकला जावा, पण कंपनीचे लोगो झाकू नये.

-स्टोअरमध्ये बुर्खा घालण्यास बंदी आहे.

लोकांनी विचारले प्रश्न

लेखिका आणि कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांनी पीयूष बंसल यांना टॅग करत X वर विचारले, “हाय पीयूष बंसल, कृपया स्पष्ट करा की Lenskart मध्ये हिजाबला परवानगी आहे, पण बिंदी आणि हातातील धार्मिक धाग्याला नाही?”

पीयूष बंसल यांचे स्पष्टीकरण

यावर पीयूष बंसल यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हे कागदपत्र आमच्या वर्तमान धोरणांना सूचित करत नाही. आमचे ग्रूमिंग धोरण काळानुसार बदलले आहे आणि त्याची जुनी रूपरेषा आज आम्ही कोण आहोत हे दर्शवत नाही. या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या गोंधळ आणि चिंतेसाठी आम्ही माफी मागतो.”

बंसल यांनी पुढे म्हटले, “Lenskart टिकली, टिळा यासह कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतीही बंदी घालत नाही. आम्ही नियमितपणे आमच्या मार्गदर्शक तत्त्वांची पुनरावलोकन करतो. आमच्याकडे संपूर्ण भारतात हजारो टीम मेंबर्स आहेत, जे आमच्या स्टोअर्समध्ये दररोज आपल्या धर्म आणि संस्कृतीचा अभिमान बाळगून काम करतात. ते सर्वजणच Lenskart आहेत.”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...