AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वाधिक वेगळे निकाल, आतंकी फंडींगचा आरोपी बारामुल्लातून तर खलिस्तान समर्थक पंजाबमधून विजयी, दोन्ही आरोपी कारागृहात

Both of them won Lok Sabha elections from jail: पंजाबमध्येही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक आणि खलिस्तानी संघटना 'वारीस पंजाब दे' पंजाबचे प्रमुख अमृतपाल सिंग खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला आहे. त्याने काँग्रेस उमेदवार कुलबीर सिंग झिरा यांचा पराभव केला

देशातील सर्वाधिक वेगळे निकाल, आतंकी फंडींगचा आरोपी बारामुल्लातून तर खलिस्तान समर्थक पंजाबमधून विजयी, दोन्ही आरोपी कारागृहात
अब्दुल रशीद शेख व अमृतपालसिंग
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 09, 2024 | 7:06 AM
Share

लोकसभा निवडणुकीत यंदा एग्झिट पोलचे निकल फोल ठरले. एनडीएला ४०० पार दाखवणाऱ्या एग्झिट पोलच्या अंदाजानंतर प्रत्यक्षात एनडीए २९१ जागांवरच थांबली. निकालात अनेक केंद्रीय मंत्री पराभूत झाले आहेत. काही माजी मुख्यमंत्र्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. अपक्ष उमेदवार आतंकी फंडींगचा आरोपी अब्दुल रशीद शेख उर्फ इंजिनियर रशीद याच्याकडून ते पराभूत झाले आहेत. अब्दुल रशीद २०१९ पासून तुरुगांत आहे. तसेच आणखी एका उमेदवाराने कारागृहात राहून विजय मिळवला आहे. खलिस्तान समर्थक वारिस दे पंजाबचा प्रमुख अमृतपालसिंग हा विजय झाली आहे. त्याने पंजाबमधील खड्डसाहेब तेथून निवडणूक लढवली होती. त्याला पावणेदोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. तो आसाममधील तुरुंगात आहे.

तुरुंगात राहुन बारामुल्लातून रशीदचा विजय

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जागेवर रशीद इंजिनियर याने विजय मिळवला. त्याने माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला. उमर यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपला पराभव मान्य केला होता. या जागेवर रशीद यांचा विजय आश्चर्यकारक आहे. कारण सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. त्याने तुरुंगातून निवडणूक लढवली आहे.

रशीदवर काय आहेत आरोप

रशीदवर अतिरिक्यांना फंडिंग केल्याचा आरोप आहे. तो तुरुंगात असताना त्यांच्या दोन मुलांनी संपूर्ण निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले. जम्मू-काश्मीरमध्ये राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सच्या मियां अल्ताफ यांच्याकडून त्यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव झाला.

तुरुंगात राहुन खलिस्तान समर्थक पंजाबमधून विजयी

पंजाबमध्येही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक आणि खलिस्तानी संघटना ‘वारीस पंजाब दे’ पंजाबचे प्रमुख अमृतपाल सिंग खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला आहे. त्याने काँग्रेस उमेदवार कुलबीर सिंग झिरा यांचा पराभव केला. ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद आहे.

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?