लखनऊमध्ये दलित डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करून मारहाण; तोंडावर तंबाखूही थुंकले, 14 जणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jun 20, 2022 | 2:27 PM

यावर त्याने आधी फूड पॅकेट फेकले, नंतर तोंडावर तंबाखू थुंकली. विनीतने विरोध केला असता अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली.

लखनऊमध्ये दलित डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करून मारहाण; तोंडावर तंबाखूही थुंकले, 14 जणांवर गुन्हा दाखल
डिलिव्हरी बॉय
Image Credit source: tv9
Follow us on

लखनऊ : आज आपला देश नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. देशाची झेप मंगळवार गेली असताना मात्र आजही आपली लोकं दलित (Dalit) सवर्ण करत आहेत. याचे नुकताच सत्य लखनऊमध्ये समोर आले असून यामुळे एका दलितावर थुंकण्यासह त्याला मारहान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर याकृत्यामुळे लखनऊमध्ये दोघांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री येथे एका डिलिव्हरी बॉयसोबत (Delivery Boy) झाला असून त्याच्याकडून जेवण (food) घेण्यास नकार देण्यात आला आणि त्यानंतर हा प्रकार झाला आहे. तर हा प्रकार फक्त तो दलित असल्याने करण्यात आला आहे.

लखनऊमध्ये शनिवारी रात्री एका ग्राहकाने झोमॅटोवरून जेवन मागवले होते. मात्र जेवन घेतना त्या डिलिव्हरी बॉयचे नाव विचारले. तो फक्त दलित असल्याने ते जेवन नाकारण्यात आले तर. एवढेच नाही तर कुटुंबीयांसह डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाणही केली गेली. त्यावर त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने तोंडावर थुंकले. ही संपूर्ण घटना आशियाना भागातील आहे. त्यानंतर त्या दलित पीडिलिव्हरी बॉयच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 नामांकित, 12 अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण केवळ मारहाणीचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नाव ऐकताच ग्राहक संतापला

आशियाना येथे राहणारा विनीत रावत झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय आहे. शनिवारी रात्री अजय सिंग नावाच्या ग्राहकाला डिलिव्हरी देण्यासाठी पाठवले होते. तो डिलिव्हरी घेऊन आला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये विनीतने आरोप केला आहे की, त्याने अजय सिंगला त्याचे नाव विनीत रावत सांगताच तो संतापला. तो शिवीगाळ करत म्हणाला – आता तुमच्या हातून आलेल्या वस्तू आम्ही घेऊ का? त्यावर मी त्यांना म्हणालो, तुम्हाला जेवण घ्यायचे नसेल तर रद्द करा, पण शिवीगाळ करू नका.

हे सुद्धा वाचा

तोंडावर तंबाखू थुंकली

यावर त्याने आधी फूड पॅकेट फेकले, नंतर तोंडावर तंबाखू थुंकली. विनीतने विरोध केला असता अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली. विनीतने तेथून कसेतरी आपली सुटका करून घेतली. आणि पोलिसांना ठाणे गाठत ही हकिकत पोलिसांना सांगितली. थोड्या वेळाने डायल-112 ची टीम आली, विनीतला त्याची गाडी दिलीआणि त्याला पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

विनीतने शिवीगाळ करत वाद घातला

या प्रकरणी आशियानाचे इन्स्पेक्टर दीपक पांडे सांगतात की, शनिवारी रात्री जेव्हा विपिन ऑर्डर घेऊन आला तेव्हा अजयला मित्राला सोडण्यास सांगितले जात होते. अजयच्या म्हणण्यानुसार, विनीत घरातून बाहेर पडताच पोहोचला. विनीतने त्याला त्याच्या घराचा पत्ता विचारला. अजयने पान मसाला खाल्ला होता. विनीतला पत्ता सांगण्यासाठी त्याने मसाला थुंकला. त्याचा शिडकावा विनीतवर पडला. यावर विनीतने शिवीगाळ करत वाद घातला. यावरून अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी विनीतला मारहाण केली.

वकिलासह पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर एफआयआर दाखल

पोलिसांनी सांगितले की, विनीतच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दोन्ही बाजू शांत झाल्या होत्या. पोलीस विनीतला पोलीस ठाण्यात आणत होते. मात्र त्याने त्यावेळी नकार दिला. रविवारी वकिलासोबत येऊन एफआयआर दाखल केला. सध्या तक्रारीवरून तपास सुरू आहे. दोन्ही बाजूंची कसून चौकशी केली जाणार असून सीसीटीव्हीचीही तपासणी करण्यात येणार आहे.