AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात डिलिव्हरी बॉयची अश्लिल शेरेबाजी, रस्त्यावरच तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रात चाललंय काय ?

पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने रस्त्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत चालला आहे.

पुण्यात डिलिव्हरी बॉयची अश्लिल शेरेबाजी, रस्त्यावरच तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रात चाललंय काय ?
WAKAD POLICE STATION
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 7:28 PM
Share

पुणे : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये विनयभंगाची एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने तरुणीचे रस्त्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (molestation case registered against swiggy delivery boy who tried to kiss girl on road in pune pimpri chinchwad)

तरुणीला जवळ ओढत चुंबन घेण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आज (14 सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमधील एका रस्त्यावरून जात होती. मात्र, अज्ञात स्वीगी डिलिव्हरी बॉय अचानकपणे तरुणीसमोर आला. तसेच जवळ येऊन त्याने तरुणीला अश्लिल शेरेबाजी केली. एवढ्यावरच न थांबता डिलिव्हरी बॉयने तरुणीला एका हाताने जवळ ओढून मिठी मारुन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

विनयभंगाचा गुन्हा दाखल, तपास सुरु

आरोपी तरुणाचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असावे असे सांगण्यात येत आहे. हा प्रकार घडताच तरुणीने डिलीव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी बॉयविरोधात वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस डिलिव्हरी बॉयचा शोध घेत असून तपास सुरु आहे.

विनयभंगाच्या तक्रारीची धमकी देत पैसे उकळण्याचा प्रयत्न

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातीलच चाकणमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. चाकणमधील नगरसेवक किशोर शेवकरी यांना विनयभंगाच्या तक्रारीची धमकी देत त्यांच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आलीये. या प्रकरणी पुण्यातील चाकण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

एका महिलेला विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास सांगितले आणि त्यानंतर चाकणचा माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, सामाजिक कार्यकर्ते आणि एका पत्रकाराने संबंधित नगरसेवकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीअंती बारा लाख रुपये किंवा पाच लाख रुपये सलोनी वैद्य हिच्या कॅन्सरच्या सर्जरीला खर्च करण्याची मागणी वेळोवेळी केली.

नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉट्सअॅप चॅट तक्रारदाराने पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, कल्पेश भोईर, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, प्रणित, कुणाल राऊत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दोन आरोपींना चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

चेहऱ्यावर कापड हातात कुऱ्हाड, चाकू; भररात्री पेट्रोल पंपावर दरोडा, नागपुरात खळबळ

लॉकडाऊनमुळे बेरोजगार, सुरु केला चक्क नोटांचा छापखाना, नाशिकमध्ये लाखो रुपये छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, न्यायालयाने 18 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

(molestation case registered against swiggy delivery boy who tried to kiss girl on road in pune pimpri chinchwad)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.