लॉकडाऊनमुळे बेरोजगार, सुरु केला चक्क नोटांचा छापखाना, नाशिकमध्ये लाखो रुपये छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना तयार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनमुळे बेरोजगार, सुरु केला चक्क नोटांचा छापखाना, नाशिकमध्ये लाखो रुपये छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
INDIAN CURRENCY

नाशिक : कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केलं आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांना समजले आहे. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्या आहेत. (nashik police arrested seven accused for printing fake currency notes)

काम नसल्यामुळे सुरु केला नोटांचा छापखाना

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिटिंगचा व्यवसायही ठप्प झाला होता. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी चक्क नोटांचा छापखाना सुरु केला. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरु होते.

बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

विशेष म्हणजे नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले जायचे. मागील तीन महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात बनावट नोटा आणल्या जात होत्या. मात्र हा प्रकार समोर यायला जास्त वेळ लागला नाही. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना आमच्याकडे बनावट नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचे समजले आणि आरोपींच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला.

नोटा छापण्याचं जाळं विंचूरपर्यंत पसरलं 

नाशिकच्या व्यापाऱ्यानी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसां नी या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट नोटांच्या छापखानाचा पर्दाफाश केला. सुरगाणा तालुक्यातीला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र हे जाळं लासलगाव जवळील विंचूरपर्यंत पसरलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राजकीय क्षेत्रातही खळबळ

दरम्यान, या कारवाईत नाशिक पोलसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद असल्याने बनावट नोटा छापण्याचं धाडस अटक केलेल्या लोकांनी केलं आहे. या घटनेमुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय राजकीय व्यक्तीचा यामध्ये काही हस्तक्षेप आहे का ? याचादेखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातदेखील खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या

हॉटेलमध्ये नवरा-बायको म्हणून मुक्काम, बॉयफ्रेण्डकडून चारित्र्यावर संशय, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

विनयभंगाच्या तक्रारीची धमकी, पुण्यातील नगरसेवकाकडे 15 लाखांच्या खंडणीची मागणी

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाला म्हणून खोट्या नोटा छापल्या, नाशकात सात जणांना अटक

(nashik police arrested seven accused for printing fake currency notes)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI