करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, न्यायालयाने 18 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर आज अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयमध्ये सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी येत्या 18 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, न्यायालयाने 18 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली
करुणा शर्मा

बीड : करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अंबाजोगाई  जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली होती. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी सुनावणी होणार होती होती. मात्र ही सुनावणी येत्या 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यापुढेही 18 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीतच रहावं लागणार आहे.

या प्रकरणात फिर्यादी आणि तपास अधिकारी यांचा जवाब नोंदविला गेला नाही म्हणून न्यायालयाने या प्रकरणावरची सुनावणी अठरा तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. 20 सप्टेंबर पर्यंत करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुढच्या 18 तारखेला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

फिर्यादी आणि पोलिसांचा जवाब मिळाला नाही म्हणून 18 तारखेला सुनावणी – जयंत भारजकर

करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर आज अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयमध्ये सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणांमध्ये न्यायालयाने फिर्यादी आणि तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा जवाब मागवला होता तो अद्याप न्यायालयाला प्राप्त झाला नाही. म्हणून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 18 तारखेपर्यंत वाढवली आहे, असं मत करुणा शर्मा यांचे वकील जयंत भारजकर यांनी व्यक्त केलंय.

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

शर्मांची तक्रार

परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.

(karuna Sharma Bail hearing will be held in 18 September Ambajogai Court)

संबंधित बातम्या:

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी 5 वर्षांचा कारावास, महाराष्ट्रातील कोर्टाचा सुपरफास्ट निकाल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI