पतीने कोर्टाबाहेर पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या, ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर होती पत्नी

लखनऊच्या गोमतीनगरमध्ये ICICI बँकेबाहेर दिवसाढवळ्या पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडात महिलेचा पती मानस याच्यावरच आरोप होत असून, त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याचे वृत्त आहे. नेमकं काय घडलं तिथे ?

पतीने कोर्टाबाहेर पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या, ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर होती पत्नी
दुहेरी हत्याकांडाने हादरलं लखनऊ
| Updated on: Aug 20, 2026 | 3:21 PM

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर हा पॉश परिसर गुरूवारी भीषण हत्याकांडाने हादरला. तिथे एका इसमाने आधी त्याची पत्नी आणि बहीण यांच्यावर दिवसाढवळ्या , सर्वांसमक्ष गोळ्या झाडल्या, त्यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. त्या दोघींवर गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वत:लाही गोळी मारून घेतली, तो गंभीरररित्या जखमी झाला आहे. या गोळीबारामुळे संपूर्ण भागात प्रचंड खळबळ माजली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दिव्या मिश्रा असं मृत महिलेचं नाव असून ती ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत होती. दिव्या ही आरोपीची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या दुसऱ्या महिलेचं नाव सीमा वाजपेयी असून ती आरोपी मानस याची बहीण होती, अशी माहिती समोर आली आहे. गोळीबाराची ही धक्कादायक घटना बँकेच्या अगदी बाहेर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमकं काय झालं ?

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने बँकेबाहेर दोन्ही महिलांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागल्यानंतर दोघीही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच गोंधळ उडाला. तर गोळीबार करणारा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेची घटनेची माहिती मिळताच गोमतीनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.  पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, हत्येमागील कारणांचा तपास केला जात आहे.

CCTVचं फुटेज तपासण्यास सुरूवात

पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद, हे या हत्याकांडामागील संभाव्य कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीसांकडून या परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरूवात झाली आहे. आरोपी बँकेबाहेर कधी आणि कसा आला, तसेच गोळीबार नेमका कशा प्रकारे झाला, याचा तपास CCTVच्या माध्यमातून केला जात आहे.

गोळीबाराची ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी कोण-कोण उपस्थित होतं आणि कोणी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला होता का, याचाही पोलीसांकडून तपास केला जात आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर गोमतीनगर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us