AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एम.के.स्टॅलिन तरुणांना बहुभाषिक होण्यापासून वंचित ठेवत आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

एका प्रगत, समावेशक शैक्षणिक सुधारणेला ‘हिंदी भाषिक लादणी’ म्हणून चुकीचे सादर करणे हे अनावश्यक भीती आणि संभ्रम निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. असे करून तुम्ही भारताच्या भाषिक विविधतेचे संरक्षण करणाऱ्या घटनात्मक भावनेचा अवमान करीत आहात. “हिंदी भाषा लादल्याचा ” चा मुद्दा वापरून तुम्ही तुमचे प्रशासकीय अपयश झाकणे थांबवावे आणि प्रत्येक भारतीय भाषेला सक्षम करण्याच्या राष्ट्रीय ध्येयात सहभागी व्हावे असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना आवाहन केले आहे.

एम.के.स्टॅलिन तरुणांना बहुभाषिक होण्यापासून वंचित ठेवत आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप
M.K. Stalin and Dharmendra Pradhan
| Updated on: Apr 04, 2026 | 6:19 PM
Share

राष्ट्रीय शिक्षण धोरण सर्वच भाषांना समान प्रोत्साहन देऊन घटनात्मक तत्वांना बळ देत आहे. मात्र, सध्याच्या दोन भाषा प्रणालीला मर्यादा आहे. त्यामुळे तीन भाषांचा समावेश करणार करत आहे. मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला हिंदी सक्तीचे म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर करत असल्याचा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. एका लवचिक धोरणाला “अनिवार्य हिंदी” म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर करून, तुम्ही तामिळींचे संरक्षण करत नाहीत तर आपल्या युवकांना बहुभाषिक जागतिक नेते होण्याच्या संधीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी स्टॅलिन यांच्यावर केला आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सीबीएससी सहावीपासून तीन भाष धोरण आणत आहे. यावरुन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हिंदी भाषा लादण्याचा आरोप करीत विरोध केला आहे. त्याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे.बहुभाषिकतेला धोका म्हणून दाखवणे चुकीचे आहे. तामिळ भाषा इतर भाषा शिकल्याने कमकुवत होत नाही; उलट तरुण बहुभाषिक, आत्मविश्वासपूर्ण आणि भाषिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर तमिळ भाषा अधिक समृद्ध होते असे धमेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

बहुभाषिक होण्याच्या संधींपासून वंचित

हिंदी भाषा लादणे हा तुमचा आरोप हा राजकीय अपयश झाकण्याचा एक जुना प्रयत्न आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे प्रत्यक्षात भाषिक मुक्ततेचे घोषणापत्र आहे. ते मातृभाषेला प्राधान्य देते, ज्यामुळे प्रत्येक तामिळ विद्यार्थी आपल्या गौरवशाली भाषेत उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. एका लवचिक धोरणाला “अनिवार्य हिंदी” म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर करून, तुम्ही तामिळचे संरक्षण करीत नाही; उलट आपल्या युवकांना बहुभाषिक जागतिक नेते होण्याच्या संधींपासून वंचित ठेवण्यासाठी अडथळे निर्माण करत आहात असाही आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स पोस्ट करुन केला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण हे सर्व भाषांना समान प्रोत्साहन देऊन घटनात्मक तत्त्वांना बळ देते आणि विद्यमान दोन-भाषा प्रणालीच्या मर्यादाही स्पष्ट करते. तसेच समग्र शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, DIETs सारख्या संस्थांचे बळकटीकरण आणि NPST आणि NMM सारख्या राष्ट्रीय आराखड्यांद्वारे अंमलबजावणीवरही हे नवे शिक्षण धोरण भर देते असेही धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.

तामिळ भाषेला राष्ट्रीय संपत्ती म्हणून गौरविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळ भाषेला राष्ट्रीय संपत्ती म्हणून गौरविले आहे. काशीपासून तमिळ संगममपासून ते जागतिक मंचापर्यंत तिचा गौरव केला आहे.केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना भारतीय भाषा स्वीकारण्यास प्रोत्साहित करीत असताना, तुमचे सरकार विभाजनकारी मतदार राजकारणासाठी तामिळ विद्यार्थ्यांना विविध संधींपासून वंचित ठेवत आहे असाही आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.

येथे पोस्ट पाहा –

नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यास अडथळे

याआधी मान्यता देऊनही तामिळनाडूमध्ये PM SHRI शाळांची स्थापना करण्यासाठी आवश्यक MoU वर स्वाक्षरी करण्यास नकार देऊन तुमच्या सरकारनेच या प्रक्रियेला अडथळा आणला आहे असेही धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही तामिळनाडूमध्ये नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यास तुमचे सरकार अडथळे निर्माण करीत आहे. केवळ राजकीय नॅरटिव्हसाठी असा विरोध करणे हे गुणवत्तापूर्ण, गुणवत्तेवर आधारित निवासी शिक्षणाचा लाभ घेऊ शकणाऱ्या लाखो वंचित विद्यार्थ्यांप्रती थेट अन्याय आहे असेही धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. यानिर्णयामुळे एक आधुनिक पायाभूत सुविधा आणि शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांपासून दूर ठेवले गेले आहेत. केंद्र सरकार निधी आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी पूर्णतः वचनबद्ध आहे, परंतू या प्रगतीत तुमच्या अप्रामाणिक राजकारणामुळे अडथळा येत आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल