नाटकाची तालीम करताना गळफास लागला, 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथे एका 12 वर्षाच्या मुलाने आपल्या नाटकातील अभिनयामध्ये जीवंतपणा दाखवण्यासाठी स्वत:ला फाशावर लटकवले.

, नाटकाची तालीम करताना गळफास लागला, 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. एका 12 वर्षाच्या मुलाने आपल्या नाटकातील अभिनयामध्ये जिवंतपणा दाखवण्यासाठी स्वत:ला फाशावर लटकवले. यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला (MP Priyanshu Died). मंदसौर येथील अफजलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडवान गावात पाच दिवसांपूर्वी 1 फेब्रुवारीला ज्ञान सागर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांच्यावर एक नाटक बसवण्यात आलं. यामध्ये 12 वर्षांचा प्रियांशू हा ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता (Bhagat Singh Play). यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियांशू हा शेतातील एका झोपडीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांच्या मते, प्रियांशूजवळ एक मोबाईल आढळून आला. त्याच्याजवळ एक मोबाईल आढळून आला. यामध्ये शाळेतील नाटकाचे व्हिडीओ होते. कदाचित प्रियांशू या नाटकाची प्रॅक्टिस करत असेल आणि ज्या पलंगावर तो उभा होता त्यावरुन त्याचा तोल गेला असावा. त्यामुळे प्रियांशूच्या गळ्याभोवती फास लागून त्याचा मृत्यू झाला असावा. सध्या ही एक दुर्घटना असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

प्रियांशूचे वडील विनोद मालविय हे लामगरा येथील शासकीय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रियांशूला दोन लहान भाऊ आहेत. तो शाळेत फार कमी यायचा. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यावरुन प्रियांशूला नाटकात ब्रिटीश अधिकाऱ्याचा रोल दिला. नाटकात फाशीचा कुठलाही सीन नव्हता. मात्र, त्याच्या डोक्यात हे कुठून आलं हे कळायला मार्ग नाही, असं शाळेचे प्राध्यापक अरुण जैन यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *