AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन

आसाममधील गुवाहाटी येथे एका भिकाऱ्याच्या घरातून तब्बल ₹54 कोटी किमतीचे 37 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मूळचा महाराष्ट्रातील सांगलीचा असलेला अक्षय बनसोडे हा भिकारी बनून सोन्याची तस्करी करत होता. म्यानमार मार्गे मिडल ईस्टसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोने तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश या कारवाईमुळे झाला असून, ही पूर्वोत्तर भारतातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन
भिकाऱ्याच्या घरातच सापडला सोन्याचा डोंगर
| Updated on: Jul 16, 2026 | 1:48 PM
Share

भिकारी बनून सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करणारा एक व्यक्ती मोठा खिलाडी असल्याचं समोर आलं आहे. या भिकाऱ्याने आसाममध्ये एक घर खरेदी केलं होतं. या घरात तो सोनं लपवून ठेवायचा. आसाम पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला तेव्हा फक्त चक्कर यायचीच बाकी राहिली. या घरात सोन्याचा डोंगरच सापडला. प्रचंड सोनं आणि चांदी सापडली. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून या भिकाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे. या भिकाऱ्याचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी या भिकाऱ्याच्या गुवाहाटीतील घरी छापा मारला. तेव्हा त्यांना 37.064 किलो सोनं सापडलं. या सोन्याची किंमत 54 कोटी इतकी आहे. पूर्वोत्तर भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं सापडण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. आरोपी भिकाऱ्याचं नाव अक्षय परशुराम बनसोडे आहे. तो महाराष्ट्रातील सांगलीचा राहणारा असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

घरात काय सापडलं?

गुवाहाटी पोलीस कमिश्नरेटच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि लतासिल पोलीस ठाण्याने गुवाहाटीच्या खारघुली येथील एका घरात संयुक्त छापा मारला. या छापेमारीत घरातून 37.064 किलो सोन्याच्या विटांचे तुकडे मिळाले. पोलिसांच्या मते, या संपूरअण सोन्याची किंमत 54 कोटी आहे. छापेमारीत 13 ग्रॅम चांदीचे तुकडेही सापडले आहेत. चार मोबाईल फोन, 3755 रुपये रोख रक्कम आणि सोनं लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅगाही सापडल्या आहेत.

तस्करी करायचा…

अक्षय परशुराम बनसोडे (वय 32) हा महाराष्ट्रातील सांगलीचा राहणारा आहे. त्याने गुवाहाटीच्या गांधी बस्ती परिसरात एक घर भाड्याने घेतलं होतं. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून तो दिव्यांग भिकारी बनून फिरत होता. तो आसाममध्ये म्यानमार मार्गे सोन्याची तस्करी करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिडल ईस्टशी संबंध

29 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या सोन्याचा तपास केला असता हे 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे. आसाम पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. मीडिल ईस्ट, म्यानमार आणि भारतातील अनेक शहरातील आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या नेटवर्कशी यांचे संबंध असल्याचं चौकशीतून उघड झालं आहे. या नेटवर्कमध्ये कोण कोण आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.

Follow Us
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ