AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगळुरु एअरपोर्टवर मोठा विमान अपघात, विमान थेट रनवेलाच घासले, १७९ विमान प्रवाशांचे प्राण कंठाशी…

या अपघाताने बंगलुरु वरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानाला रद्द करण्यात आले आहे. एअर इंडियाने प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. या अपघाताने मोठा हानी थोडक्यात टळली आहे.

बंगळुरु एअरपोर्टवर मोठा विमान अपघात, विमान थेट रनवेलाच घासले, १७९ विमान प्रवाशांचे प्राण कंठाशी...
Air india file photo
| Updated on: May 21, 2026 | 7:14 PM
Share

दिल्ली ते बंगळुरु जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या एका विमानाला लँडिंग करताना मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. बंगलुरु एअरपोर्टवर उतरताना एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI2651 ‘टेल-स्ट्राईक’ (Tail-Strike) अपघाताचा फटका बसला. विमानाचा खालचा भाग अचानक रनवेला घासला गेला. मात्र, पायलटने मोठे प्रसंगावधान राखले आणि विमानाला सुरक्षितपणे लँड केले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रु मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. एअर इंडियाच्या या विमानात १७९ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

प्रवाशांनी भरलेल्या या विमानाच्या पायलटला लँडींग करताना पुढे उड्डाण घेणाऱ्या एका अन्य विमानामुळे wake turbulence चा त्रास झाला. त्यामुळे विमानाचे नियंत्रण प्रभावित झाले आणि विमानाची शेपटी रनवेला घासली गेली. विमानाला तपासणी करण्यासाठी ग्राऊंड करण्यात आले आहे.

या घटनेमुळे बंगलुरुवरुन दिल्लीला जाणारी फ्लाईट AI2652ला रद्द करावी लागली. एअरलाईनने प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरु एअरपोर्टवर एअर इंडियाच्या ग्राऊंड टीम प्रवाशांना आवश्यक सहकार्य केले जात आहे. एव्हीएशन एक्सपर्ट्सच्या मते वेक टर्बुलन्स सारखी स्थिती पाठवून येणाऱ्या विमानाची स्थिरता अचानक प्रभावित करु शकते, ज्यामुळे या सारख्या घटनांचा धोका वाढला जातो.

सरकारी नियमांची होत आहे तपासणी

एअर इंडियाने सांगितले की एअरलाईन या घटनेचा संपूर्ण तपासणी सरकारी नियम आणि प्रक्रियांअंतर्गत करत आहे. कंपनीने म्हटले आहे की बंगलुरुमध्ये त्यांची टीम प्रवाशांना शक्य ती सर्व मदत करत आहे. एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या असुविधेसाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि प्रवाशांची आणि क्रु मेंबर्सची सुरक्षा त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी एअर इंडियाची विमान लँडींगसाठी उतरत होते. त्याच्या काही वेळ आधीच एका Boeing 747 नावाच्या विमानान टेक ऑफ घेतला होता. या बोईंग विमानच्या इंजिनांनी तयार झालेली वेगवान हवेचा (Wake Turbulence)फटका पाठवून उतरणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानाला बसला. स्थितीचा अंदाज घेता पायलटने लागलीच प्रसंगावधानता दाखवत स्टँडर्ड प्रोसीजर अंतर्गत गो- अराऊंड लँडिंग सोडून पुन्हा घिरकी मारणे सुरु केले, म्हणजे पुन्हा नीट लँडींग करता यावे.

काय असते टेल-स्ट्राईक?

‘टेल-स्ट्राईक’ (Tail-strike) चा अर्थ विमानाच्या मागचा भाग जमीनीला ठेकणे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मते असे तेव्हा होते जेव्हा विमान टेक ऑफ, लँडींग वा गो- अराऊंड ( लँडिंग रद्द करुन पुन्हा चक्कर मारणे ) करताना एका खास एंगलवर झुकले जाते. ज्यामुळे त्याची शेपटी रनवेला स्पर्श करते. त्यामुळे कधी – कधी विमानावरचे नियंत्रण गमावणे किंवा त्याचे रनवेच्या बाहेर जाणे अशा घटना होतात.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल