AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती, NCLT सुनावणीत घडलं काय?

Subhash Chandra NCLT: एस्सल समूहाचे संचालक सुभाष चंद्रा यांच्या 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात मोठा झटका बसला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) सुनावण्यात यापूर्वीच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. आज 5 सदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी झाली, त्यात काय घडलं?

सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती, NCLT सुनावणीत घडलं काय?
सुभाष चंद्रा, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 01, 2026 | 11:45 AM
Share

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) मंगळवारी एस्सल समूहाचे संचालक सुभाष चंद्रा यांना मोठा झटका दिला. चंद्रा यांच्या वैयक्तिक दिवाळखोरीच्या प्रकरणात यापूर्वी दिलेल्या 25 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. तर हमीदार म्हणून (guarantors) त्यांनी आपली मालमत्ता प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे अन्य कुणालाही हस्तांतरीत करू नये अथवा विकू नये असे निर्देशही न्यायाधिकरणाने दिला आहे. यापूर्वीच्या तीन सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. आता हे प्रकरण NCLT च्या पाच सदस्यांच्या विशेष खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. आज सकाळी त्यावर सुनावणी झाली.

आजच्या सुनावणीत काय झालं?

मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. विशेष खंडपीठाने त्यांचं मत नोंदवलं. यापूर्वीच्या आदेशामध्ये अंतर होते आणि कोणतेही स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे तो अंतिम आदेश नव्हता. न्यायाधिकरणाने याप्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात पहिल्यांदा 3 सप्टेंबर 2025 रोजी दोन सदस्यांनी भिन्न निर्णय दिले होते. अशोक कुमार भारद्वाज यांनी सुभाष चंद्रा यांना 6.25 कोटी कर्ज परतफेड योजनेला मंजूरी दिली होती. त्यावरून देशभरात मोठे वादंग उठले होते. बड्या उद्योजकांना देण्यात येत असलेल्या या विशेष सवलतीवर टीकेची झोड उठली होती.

यापूर्वीच्या आदेशावर अनेक सवाल

यापूर्वीच्या आदेशावर सवाल उपस्थित करण्यात येत होते. 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात 6.25 कोटी कर्ज परतफेड योजनेला मंजूरी देण्यात आली होती. या आदेशाला आता पाच सदस्यीय विशेष खंडपीठाने स्थगिती दिली आहे. विशेष खंडपीठासमोर या प्रकरणी पुन्हा सुनावणी होत आहे. दरम्यान हमीदार म्हणून सुभाष चंद्रा यांनी आपली मालमत्ता प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे अन्य कुणालाही हस्तांतरीत करू नये अथवा विकू नये असे निर्देशही न्यायाधिकरणाने दिला आहे. याप्रकरणी पाच सदस्यीय विशेष खंडपीठ पाचही सदस्यांचा विचार, मत लक्षात घेऊन लवकर निर्णय देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

झेडएमसीएलच्या शेअरमध्ये घसरण

या ताज्या निकालानंतर ZMCL, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. BSE च्या नवीन आकड्यांनुसार, झेडएमसीएलच्या शेअरमध्ये जवळपास एक टक्क्यांची घसरण दिसली. हा शेअर सकाळच्या सत्रात 8.54 रुपयांवर ट्रेड करत होता. या व्यापारी सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 8.37 रुपयांच्या निच्चांकावर पोहचला. सोमवारच्या तुलनेत आज सकाळी हा शेअर 8.70 रुपयांच्या तेजीसह उघडला होता. तर एक दिवसापूर्वी हा शेअर 8.61 रुपयांवर बंद झाला होता.

Follow Us
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे