बायकोच्या चप्पलमध्ये लावलं GPS ट्रॅकर, बॉयफ्रेंडसोबत पत्नी दिसली अशा अवस्थेत की…पतीच्या पायाखालची जमीनच सरकली!
सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्रॅकर लावले. याच ट्रॅकरच्या मदतीने आपल्या पत्नीला त्याने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.

Extramarital Affair : एकदा लग्न झालं की वधू आणि वर दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. कठीण काळ असो किंवा एखादे संकट आलेले असो दोघेही पती-पत्नी एकमेकांसोबत राहतील, अशी शपथच या लग्नाच्या माध्यमातून एकमेकांना दिली जाते. म्हणूनच लग्नानंतर पती-पत्नीचे नाते हे पवित्र समजले जाते. परंतु पती-पत्नीची अशी काही प्रकरणं समोर आलेली आहेत, ज्यांना पाहून धक्काच बसेल. काही ठिकाणी पतीने पतीचा तर काही ठिकाणी पत्नीचा खून केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या आणि पाहिल्या असतील. विवाहबाह्य संबंधाच्या तर अनेक कहाण्या रोजच वाचायला मिळत आहेत. दरम्यान, सध्या असेच एक चक्रावून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आपल्या पतीला अंधारात ठेवून विवाहबाह्य संबंधात गुंतली होती. जीपीएसच्या मदतीने या महिलेच्या पतीने तिचे हे कृत्य समोर आणले आहे. या घटनेची संपूर्ण देशात चर्चा होत आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना बिहार राज्यातील पाटण्यातील आहे. तेथे फुलवारी शरीफ या भागात एकदा नगर नावाचा परिसर आहे. याच परिसरात पतीने आपल्या पत्नीला जीपीएसच्या मदतीने रंगेहाथ पकडले आहे. पतीने चक्क आपल्या पत्नीच्या चप्पलमध्ये जीपीएस लावून तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले आहे.
पतीने पत्नीचे प्रकरण कसे बाहेर काढले?
गेल्या अनेक दिवसांपासून पतीला आपल्या बायकोवर संशय होता. तिचे कुठेतरी बाहेर अफेअर असल्याचे त्याला वाटत होते. याबाबतची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याने पत्नीच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्र्रॅकर लावले आणि बाहेर कामाला गेला. पती बाहेर गेल्यानंतर पत्नी जीपीएस लावलेली चप्पल घालून बाहेर गेली. चप्पलमधील जीपीएस ट्रॅकच्या मदतीने पतीने पत्नीचे ठिकाण शोधले. परंतु समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले पण….
जीपीएसच्या मदतीने एका घरात गेल्यानंतर संबंधित व्यक्तीची पत्नी तिच्या प्रियकरासोबत दिसून आली. त्यानंतर मात्र खूपच वाद झाला. पतीने पत्नीच्या प्रियकराजवळचे पिस्तुल आणि सोन्याची चेन घेतली. त्यानंतर हे प्रकरण थेट फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु पोलिसांनी समजूत घालतल्याने कोणीही तक्रार नोंदवली नाही. सध्या हे प्रकरण मिटलेले आहे. परंतु या प्रकरणाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.