AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूतबाधा काढण्याच्या नावाखाली भावाच्या बायकोवरच वासना शमवली, वहिनी विधीसाठी खोलीत येताच दीराने..

सोमवारी रात्री तंत्र-मंत्राचे विधी करण्यासाठी भावाच्या घरी आला. दारु, अंडी, नारळ अशा वस्तुंची त्याने व्यवस्था करायला सांगितली होती. सुरुवातीला त्याने त्याच्या भावावर काही विधी केले. त्याने त्याला खोलीतून निघून जायला सांगितलं.

भूतबाधा काढण्याच्या नावाखाली भावाच्या बायकोवरच वासना शमवली, वहिनी विधीसाठी खोलीत येताच दीराने..
occultistImage Credit source: Representative Image
| Updated on: May 22, 2026 | 3:16 PM
Share

काळी विद्या, भूत बाधा, जादू टोणा यात फसवणूकच होते. पेपर, टीव्ही, वेब साईटवर लोकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या सतत येत असतात. तांत्रिकाने इतक्या लाखांना फसवलं किंवा महिलेवर अत्याचार केला. पण तरीही लोकांमध्ये अजून पूर्ण जागृती झालेली नाही. समाजातील एक वर्ग अजूनही अशा भूल थापांना बळी पडतो. भूतबाधा झाली म्हणून भूत काढण्याच्या नावाखाली लोकांना अक्षरश: लुटलं जातं. काहीवेळा स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकला जातो. महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरातचं ताजं उदहारण आहे. या माणसाने कशा पद्धतीने स्त्रियांवर अत्याचार केले ते सर्वांसमोर आहे. आता असचं एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात कुटुंबातल्या माणसानेच भूतबाधा काढण्याच्या नावाखाली स्वत:ची वासना शमवून घेतली. हे मध्य प्रदेश भोपाळमधील प्रकरण आहे.

आरोपी मांत्रिकाने आधी गुप्त शाप लागल्याचं सांगून कुटुंबाला घाबरवलं. भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली या मांत्रिकाने स्वत:च्या वहिनीवर अत्याचार केले. सिविल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात आरोपी मांत्रिक पेशाने मॅकेनिक आहे. पण, तो भूतबाधा उतरवण्याचे दावे करुन तांत्रिकाचही काम करतो. त्याने अलीकडेच भावाला सांगितलं की, तुझ्या कुटुंबावर कोणीतरी काळी जादू केली आहे. त्यानंतर भावाच्या कुटुंबाने शापातून मुक्तीसाठी उपाय सुचवण्याची विनंती केली.

दारु, अंडी, नारळ अशा वस्तुंची व्यवस्था

आरोपी सोमवारी रात्री तंत्र-मंत्राचे विधी करण्यासाठी भावाच्या घरी आला. दारु, अंडी, नारळ अशा वस्तुंची त्याने व्यवस्था करायला सांगितली होती. सुरुवातीला त्याने त्याच्या भावावर काही विधी केले. त्याने त्याला खोलीतून निघून जायला सांगितलं. आरोपीने भावाला सांगितलं की, तुझ्या पत्नीवर सफाईचे काही विधी केल्याशिवाय काळीजादू, भूतबाधेतून मुक्ती मिळणार नाही. तपास अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

पत्नी बेशुद्धावस्थेत होती

भावाची पत्नी खोलीत येताच त्याने दरवाजाला आतून कडी लावून घेतली. आरोपीने तिच्या कपाळावर गुंगी आणणारं काहीतरी लावलं. हळूहळू महिलेची शुद्धा हरपत गेली. त्या स्थितीचा फायदा उचलून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. त्याने कुटुंबाला आश्वसत केलं की, तुमच्या कुटुंबावरची काळी सावली आता निघून गेली आहे. भाऊ आतमध्ये गेल्यानंतर पत्नी बेशुद्धावस्थेत होती. पत्नीला शुद्ध आल्यानंतर तिने तिच्यासोबत काय घडलं ते सांगितलं.त्यानंतर आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ