अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत CRPF चे 5 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 5 जवान शहीद झाले आहेत. अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या बरोबर अगोदर दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला.

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत CRPF चे 5 जवान शहीद

अनंतनाग: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 5 जवान शहीद झाले आहेत. अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या बरोबर अगोदर दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी आज गर्दीच्या रस्त्यावर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका गस्त पथकावर हल्ला चढवला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

या चकमकीत आतापर्यंत CRPF चे 4 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांना एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यशही आल्याची माहिती पोलिसांनी दिली. के.पी, जनरल बस स्टँडजवळील खोऱ्यात एका वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा दलाच्या गस्त पथकावर हल्ला चढवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अनंतनागचे पोलीस निरिक्षकही जखमी

अनंतनागच्या केपी रोडवर 2 दहशतवाद्यांनी CRPF च्या पथकावर स्वयंचलित रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला. तसेच ग्रेनेडही फेकले. यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला आहे. अनंतनाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरशद अहमद देखील या चकमकीत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आले.

अल-उमर-मुजाहिद्दीनने जबाबदारी घेतली

दहशतवादी संघटना अल-उमर-मुजाहिद्दीनने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या दहशतवादी संघटनेने 5 जवानांना मारल्याचा दावाही केला आहे. तसेच असे हल्ले सुरुच राहतील, अशी धमकीही दिली आहे. दरम्यान, फेब्रुववारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये एका आत्मघातकी दहशतवाद्याने सुरक्षा दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *