AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती होती तेच घडलं; रशियाने 90 मिसाईल डागल्या, 600 ड्रोनने भीषण हल्ला, आता युद्ध भडकणार

मोठी बातमी समोर येत आहे, रशियाकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वीच पुतिन यांनी इशारा दिला होता, त्यानंतर तब्बल 600 ड्रोन आणि 90 मिसाईलने हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आता युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

ज्याची भीती होती तेच घडलं; रशियाने 90 मिसाईल डागल्या, 600 ड्रोनने भीषण हल्ला, आता युद्ध भडकणार
vladimir putin Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 10:12 PM
Share

युक्रेनकडून दोन दिवसांपूर्वी रशियाच्या एका शहरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तसेच त्या परिसरात रात्रभर हल्ले सुरूच होते. युक्रेनकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये रशियाचे 38 नागरिक देखील जखमी झाले होते. त्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे अधिक आक्रमक झाले होते. नागरी वस्तींवर आणि विद्यार्थ्यांच्या होस्टेलवर जाणीवपूर्वक केलेले हल्ले आम्ही सहन करणार नाहीत, याचा बदला घेऊ असा इशारा त्यांनी युक्रेनला दिला होता, सैन्याला हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश देखील दिले होते. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करणार अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. शेवटी ही भीती खरी ठरली आहे. मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाकडून युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर भीषण हल्ला करण्यात आला आहे. तब्बल 600 ड्रोन आणि 90 मिसाईलने रशियाने युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर हल्ला केला आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये हा सर्वात मोठा आणि भीषण हल्ला मानला जात आहे. रशियानं केलेल्या या हल्ल्यानंतर कीवच्या अनेक भागांमध्ये भीषण आग लागल्याचं आणी धुरांचे लोट उठल्याचं चित्र पहायला मिळालं. या हल्ल्यामध्ये युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रशियाने 600 ड्रोन आणि 90 मिसाईलचा या हल्ल्यामध्ये वापर केला आहे. हल्ला झाल्याचे कळताच युक्रेनच्या एअर डिफेंस प्रणालीने अनेक ड्रोन आणि मिसाईल निष्क्रिय केले, मात्र ड्रोन आणि मिसाईलची संख्याचं एवढी प्रचंड होती की, त्यातील अनेक मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

वृत्तसंस्था एएफपीच्या एका रिपोर्टनुसार रशियाकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये युक्रेनचं पु्न्हा एकदा प्रचंड नुकसान झालं आहे. रशियानं युक्रेनच्या लुकियानिव्स्का मेट्रो स्टेशन जवळ असलेलं मोठं बिझनेस सेंटर देखील जमिदोस्त केलं आहे. रशियाकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये युक्रेनमधील चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान रशियाच्या हल्ल्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ