AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विजय यांनी करुन दाखवलं, सरकारच्या खिशातून पैसे जाणार पण..

तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांची सत्ता आल्यापासून राज्यात मोठे बदल होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याचा भार सरकारच्या खिशावर अधिक पडणार आहे...

तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विजय यांनी करुन दाखवलं, सरकारच्या खिशातून पैसे जाणार पण..
CM Joseph Vijay
| Updated on: Sep 01, 2026 | 7:43 AM
Share

दुग्ध उत्पादनात सामिल असलेल्या तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवरी दुधाच्या किंमतींमध्ये पुन्हा 3 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. या दरवाढीनंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक लीटक दुधामागे आता थेट 44 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारी तिजोरीवर पडणार 720 कोटींचा भार पडणार आहे. सांगायचं झालं तर, याआधी 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी दुधाच्या किंमतीत 3 रुपयांची वाढ केलेली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 12 दिवसांमध्ये जोसेफ विजय यांनी दुधाच्या किंमतीत 6 रुपयांची वाढ केली आहे. 12 दिवसांत तामिळनाडू सरकारने दोन वेळा दुधाच्या किंमतीत 3 – 3 रुपयांनी वाढ केली आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची अधिक कमाई निश्चित आहे. शिवाय, दूध खरेदीच्या दरातील वाढीमुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बचत करणं आणि त्यांची खरेदीशक्ती बळकट करणं शक्य होईल.

19 ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणेनुसार, राज्य सरकारने दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करून तो 38 रुपयांवरून 41 रुपये प्रति लिटर केला होता. त्यानंतर, सरकारने आज पुन्हा एकदा खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ जाहीर केली असून, यामुळे हा दर 41 रुपयांवरून 44 रुपये प्रति लिटर झाला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

18 ऑगस्ट पर्यंत शेकऱ्यांनी 1 लीटर दुधासाठी मिळत होते 38 रुपये

सांगायचं झालं तर, 18 ऑगस्टपर्यंत तामिळनाडूतील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 38 रुपये दर मिळत होता. मात्र, १२ दिवसांच्या कालावधीत 6 रुपयांची वाढ झाल्यामुळे, आता त्यांना प्रति लिटर 44 रुपये मिळतील. पशुपालनाचा वाढता खर्च लक्षात घेऊन तामिळनाडू सरकारने हा निर्णय घेतला आहे. जोसेफ विजय यांचं सरकार आल्यापासून तामिळनाडूमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत.

दूध खरेदीच्या दरात वाढ करण्याच्या घोषणेसोबतच, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी राज्यासाठी आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, कांचीपुरम जिल्ह्यातील मदुरामंगलम येथे सेमीकंडक्टर पार्क उभारलं जाईल. याव्यतिरिक्त, चेन्नईमधील वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर उपाय म्हणून 1,762 कोटी रुपये खर्चून एक नवीन ‘पॉवर कॉरिडॉर’ उभारला जाईल.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल