AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महायुतीमधून बड्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी, राजकारणात घडामोडीला वेग

बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच भोवलं आहे. बंडखोरी केल्यामुळे जनता दल युनायटेड(JDU) कडून आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मोठी बातमी! महायुतीमधून बड्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी, राजकारणात घडामोडीला वेग
jdu mla Anant SinghImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 10:03 PM
Share

बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच भोवलं आहे. बंडखोरी केल्यामुळे जनता दल युनायटेड(JDU) कडून आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  अनंत सिंह हे मोकामा विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत. जेडीयू प्रदेश अध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी अनंत सिंह यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित केले असून, त्यांच्या पत्नी तथा माजी आमदार नीलम देवी यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हा आमदार अनंत सिंह यांच्यासाठी मोठा झटका माण्यात येत आहे.

बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.  बिहार विधान परिषद निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणं जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांना चांगलंच महागात पडलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आणि पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध जाऊन दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता पक्षानं त्यांच्यावर मोठी कारवाई केली असून,  अनंत सिंह यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित केले असून, त्यांच्या पत्नी तथा माजी आमदार नीलम देवी यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आधी पक्षातून हाकालपट्टी आता आमदारकीही जाणार? 

दरम्यान बंडखोर आमदार अनंत सिंह यांच्याविरोधात जेडीयूकडून अधिक कडक भूमिका घेण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत आधी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, त्यानंतर आता अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता तात्काळ रद्द करावी, अशी शिफारस पक्षाकडून करण्यात आली असून, त्या संदर्भात जेडीयूनं विधानसभा अध्यक्षांना अधिकृत पत्र देखील लिहिलं आहे. दरम्यान यावर आता विधानसभा  अध्यक्ष काय निर्णय घेणारं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पक्षाने विधानसभा अध्यक्षांकडे अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्याची मागणी केल्यामुळे त्यांचं विधानसभेचं सदसत्व रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अनंत सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनंत सिंह हे बिहारमधील एक मात्तबर नेते म्हणून ओळखले जातात.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...