80 हून अधिक शाळांना धमकीचे ईमेल, विद्यार्थ्यांना तडकाफडकी घरी सोडलं, अवघ्या अर्ध्या तासात सर्व शाळा रिकाम्या; देशाची राजधानी हादरली

शाळेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्यामुळे राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील 80 हून अधिक शाळांमध्ये खळबळ माजली. दिल्लीतील द्वारका येथील DPS तसेच मयूर विहारच्या मदर मेरी आणि नवी दिल्लीतील संस्कृति स्कूल व्यतिरिक्त नोएडा येथील DPS स्कूल यांसारख्या हायप्रोफाईल शाळांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा ई-मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा हा मेल मिळाल्यानंतर अनेक शाळांनी विद्यांर्थ्यांना तडकाफडकी घरी पाठवून दिले

80 हून अधिक शाळांना धमकीचे ईमेल, विद्यार्थ्यांना तडकाफडकी घरी सोडलं, अवघ्या अर्ध्या तासात सर्व शाळा रिकाम्या; देशाची राजधानी हादरली
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 12:46 PM

शाळेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्यामुळे राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील 80 हून अधिक शाळांमध्ये खळबळ माजली. दिल्लीतील द्वारका येथील DPS तसेच मयूर विहारच्या मदर मेरी आणि नवी दिल्लीतील संस्कृति स्कूल व्यतिरिक्त नोएडा येथील DPS स्कूल यांसारख्या हायप्रोफाईल शाळांचा समावेश आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा ई-मेल पाठवण्यात आला होता. धमकीचा हा मेल मिळाल्यानंतर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना तडकाफडकी घरी पाठवले.  दिल्ली पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी सर्व शाळांमध्ये जाऊन कसून तपासणी करत आहेत. या परिस्थितीत अजिबात घाबरू नका, असे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे.

मात्र यामुळे बुधवारी सकाळपासूनच दिल्लीत खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना घरी लवकर घेऊन जा असे फोन अनेक शाळांतून आल्याने पालकांची धावपळ माजली. आपलं मूल सुरक्षित असेल ना या चिंतेपायी पालकांनी पटापट शाळेत धाव घेतली. एकंदरच शहरात गडबडीचे आणि चिंतेचे वातावरण होते.

शाळांमध्ये बॉम्ब असल्याची या बातमीवर गृह मंत्रालयाचेही लक्ष आहे. हा ई-मेल कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला याबद्दल सायबर टीम कडून तपास करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहे. आतापर्यंत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा शाळांच्या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे.

धमकीच्या मेल मध्ये तथ्य नाही, घाबरू नका

शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी पाठवणाऱ्या या मेलमुळे घाबरून जाण्याची गरज नाही असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. हा एक फसवा मेल असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आवश्यक पावले उचलत आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी पोलिस आयुक्तांशी बोलून दिल्ली-एनसीआरमधील शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्यांच्या मुद्द्यावर तपशीलवार अहवाल मागवला आहे. सर्व शाळांच्या आवारात संपूर्ण तपास करा, गुन्हेगारांची लवकर ओळख पटवा आणि कोणताही निष्काळजीपणा नको अशा सूचना दिल्ली पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

एकच Email अनेक शाळांना पाठवला

दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्याने या धमकीच्या मेलवर प्रतिक्रिया दिली आहे. हा ईमेल देशाबाहेरून पाठवला गेला असावा असे ईमेलच्या आयपी ॲड्रेसवरून दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा प्रकारचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने एकच मेल एकाच वेळी अनेक खासगी तसेच सरकारी संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले आहे, असेही या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. आत्तापर्यंत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. या धमकीचे मेल आले असले तरी त्या धमकीत काहीही तथ्य नाही, घाबरण्याचे काहीच कारण नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या शाळांना मिळाला धमकीचा ई-मेल

1. द्वारका येथील डीपीएस स्कूल

2. रोहिणी येथील डीपीएस स्कूल

3. वसंत कुंज मधील डीपीएस स्कूल

4. नोएडा मधील डीपीएस स्कूल

5. दक्षिण पश्चिम दिल्ली येथील डीएवी स्कूल

6. पूर्वी दिल्ली येथील डीएवी स्कूल

7. पीतमपुरा येथील डीएवी स्कूल

8. नवी दिल्ली मधील संस्कृति स्कूल

9. मयूर विहार मधील मदर मेरी स्कूल

10. पुष्प विहार येथील का ॲमिटी स्कूल

11. नजफगड मधील ग्रीन व्हॅली स्कूल

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.