बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला ‘हे’ 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा दिला इशारा, काय प्रकरण?
ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकर याच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली, असं वक्तव्य करून बच्चू कडू यांनी गंभीर आरोप केलाय. तर ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर याच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकर याच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाली, असं वक्तव्य करून बच्चू कडू यांनी गंभीर आरोप केलाय. तर ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर याच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, असे दोन पर्याय बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकर याला दिले आहेत. जर यापैकी एकही पर्याय सचिन तेंडूलकरने मान्य केला नाहीतर येत्या 6 किंवा 7 तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार, असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

