AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी आणताना पोलिसांना मोठी भीती, कोणीतरी पाठलाग..

Tiger Shroff News: टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या मुसकळ्या आवल्या आहेत. आता या आरोपीांबाबत एक अपडेट समोर आली आहे.

Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी आणताना पोलिसांना मोठी भीती, कोणीतरी पाठलाग..
| Updated on: Oct 20, 2026 | 7:21 AM
Share

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपींना मुंबईला घेऊन जाणारे महाराष्ट्र पोलिसांचे पथक कोटा येथे परतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला पाठलाग होत असल्याची भीती वाटल्याने महाराष्ट्र पोलिसांनी रात्रभर कोटा येथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

सूत्रांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, मुंबई पोलीस सायंकाळी कोटासाठी निघाले होते, परंतु काही लोक त्यांचा पाठलाग करत होते. त्यामुळे, ते प्रथम एका पोलीस ठाण्यात थांबले आणि नंतर कोटा येथे परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या व्यवस्थेवर समाधान झाल्यावर महाराष्ट्र पोलिसांचे पथक मुंबईला परत जाईल. आता राजस्थान पोलिसांचे पथक मुंबई पोलिसांना संरक्षण देईल, असे मानले जात आहे.

आरोपींना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सोमवारी सकाळी कोटा येथे पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनमधून तीन जणांना अटक केली. या तिघांवर टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, टायगरवर गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून गेले होते. या तिघांवर दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. मुंबई पोलिसांनी तिन्ही आरोपींची ओळख फूल सिंग (१८), हृतिक महातो (२२) आणि रिहाब रहिमुद्दीन (१८) अशी पटवली आहे.

महाराष्ट्र पोलीस सायंकाळी मुंबईसाठी रवाना झाले. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर, मुंबई पोलीस सायंकाळी कोटासाठी रवाना झाले. कोटा येथील स्थानिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. कोटाचे एएसपी सुभाष चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, त्यांनी तिन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपींची वैद्यकीय तपासणी केली.

मुंबईतील जुहू परिसरात तीन व्यक्तींकडून टायगर श्रॉफ हल्ला करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात टायगर श्रॉफ बचावला. टायगर श्रॉफ फुटबॉलची मॅच खेळून परतत असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. या गोळीबारानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती पसरली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष