
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील बहुचर्चित सास-जावई पळून गेल्याच्या प्रकरणात पोलिस दोघांचीही सतत चौकशी करत आहेत. दोघेही पोलिसांसमोर अशा अनेक गोष्टी सतत उघड करत आहेत, ज्यामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या सांगण्यानुसार, तिचा पती तिला मारहाण करायचा, पण तिची मुलगीही काही कमी नव्हती. या सगळ्या गोंधळाला माझी मुलगीच जबाबदार आहे, असा दावा सासूने केला. तीच (मुलगी) माझ्याशी आधी वाईट वागली, मी जावयाशी बोलायला लागले की ती मला उलटसुलट बोलायची असा दावा सासूने केला आहे.
रडत रडत सासून आपली आपबिती सांगितली – मीच माझ्या मुलीचं राहुलशी जमवलं होतं, पण माझी मुलगीच माझ्यावर संशय घ्यायची. ती सतत मला टोकायची. तू राहुलशी बोलू नको, असं मला म्हणायची, तेव्हा माझं राहुलशी असं काहीच नात नव्हतं. आम्ही फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. पण आमच्या घरातल्या लोकांनींच या नात्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं, माझी मुलगीच नव्हे तर नवऱ्यानेही सर्व मर्यादा ओलांडल्या असा दावा सासूने केला.
तुझे राहुलशी अनैतिक संबंध, नवराच करायचा आरोप
अपना देवी म्हणाल्या की ( माझे पती) जितेंद्र दररोज दारू पिऊन मला राहुलबद्दल चिडवायचा. मग तो मला शिवीगाळ करायचा आणि म्हणायचा की तुझे राहुलशी अनैतिकध संबंध आहेत. असं काहीच नाहीये सांगत मी त्याला खूप समजावलं पण तो काहीही ऐकायला तयार नाही. फक्त माझ्यावर आरोप करत रहायचा. मला सगळ्या गोष्टींचा वीट आला होता, पण माझ्या मुलीचं लग्न होतं, तारीख जवळ आली होती म्हणून मी शांत बसले. या सगळ्या गोष्टी मी राहुलला सांगायचे, त्याच्याशी शेअर करायचे कारण तो समजून घ्यायचा, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
पण एके दिवशी तर हद्द झाली, माझा परतीच मला म्हणाला की तू राहुलसोबत पळून जा. ते ऐकून मी थक्क झाले. पती काय बोलला ते मी राहुलला सांगतिलं. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आता आम्ही दोघेच एकत्र राहणार, त्यानंतरच आम्ही पळून जाण्याचा प्लान रचला. मग आम्ही बिहारच्या मुझफ्फरपूरला गेलो. सगळ्यांपासून दूर आम्ही इथेच राहू असं ठरवलं, काही दिवस आम्ही मुझ्फ्फरपूरच्या हॉटेलमध्ये राहिलो. नंतर बिहार-नेपाळच्या बॉर्डरजवळ आम्ही पोचलो, तेव्हा आम्हाला समजलं की पोलिस आम्हाला शोधत आहे. मग आम्ही स्वत:च सरेंडर करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी नमूद केलं.
एकाच अटीवर करणार लग्न
सासूसोबत पळून गेलेल्या जावयाने सांगितले की, आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. ती मला फोनवर सगळं सांगायची. त्यांना आधीही छळण्यात आले होते पण माझे आणि शिवानीचे नाते जुळल्यानंतर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. मी फक्त त्यांना पाठिंबा दिला आहे. जर त्यांची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करायलाही तयार आहे. माझी फक्त एक अट आहे की त्या यासाठी तयार असल्या पाहिजेत, असं जावयाने सांगितलं.
लग्नाशिवायही राहूलसोबत राहण्यास तयार
तर सासू म्हणते, की मलाही राहुलसोबत राहायचे आहे आणि त्याच्याशी लग्न करायचे आहे. घटस्फोटाशिवाय तू लग्न करू शकत नाहीस, असं जेव्हा तिला सांगण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की – मी त्याच्यासोबत असेच राहण्यास तयार आहे. मला फक्त त्याच्यासोबत राहायचे आहे, याचा पुनरुच्चार सासूने केला.