AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत सरकारकडून My Home Group चा सन्मान; चांगल्या कार्यासाठी गौरव

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माय होम ग्रुपसाठी किती फ्लॅट विकले ही संख्या वाढवण्याचा फक्त उद्देश नव्हता, तर खरेदीदारांना चांगल्या सुसज्ज फ्लॅट दिल्याबद्दल अभिमानाची भावना आहे. हा ग्रुप आनंदी लोक, चांगले जीवन, कागदोपत्री पारदर्शकता, वेळेवर होम डिलिव्हरी, ठिकाणाची निवड आणि सुरक्षित वातावरण या त्याच्या सहा तत्त्वांवर काम करतो.

भारत सरकारकडून My Home Group चा सन्मान; चांगल्या कार्यासाठी गौरव
गृह कर्ज की होम फायनान्स?
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 8:24 PM
Share

नवी दिल्लीः भारत सरकारकडून My Home Group चा सन्मान करण्यात आला असून, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत त्यांना गौरवण्यात आलंय. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे पाचव्या Ministry of Mines Conclave चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय खनिज आणि संपदा कॉन्क्लेव्हमध्ये या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 43 खनिज कंपन्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे माय होम रिअल इस्टेटचंही नाव सन्मानित करण्यात येणाऱ्या कंपनीमध्ये समाविष्ट असून, चांगल्या कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आलाय.

खासगी क्षेत्राद्वारे खनिज मालमत्तेला चालना मिळेल

खरं तर कार्यक्रमात 5 स्टार रेटिंग असलेल्या 43 खनिज कंपन्यांचा गौरव करण्यात आलाय. राज्य सरकारांसह केंद्र सरकार खनिज संपत्तीच्या क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने खाणकामांना उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जेणेकरून खासगी क्षेत्रासाठी खाणकामासाठी वित्तपुरवठा करता येईल आणि खासगी क्षेत्राद्वारे खनिज मालमत्तेला चालना मिळेल. 2016 मध्ये प्रथमच राष्ट्रीय खनिज आणि संपदा परिषद छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आली होती.

‘My Home Group’ बद्दल जाणून घेऊयात

‘माय होम ग्रुप’ हे रिअल इस्टेटच्या जगात प्रसिद्ध नाव आहे. या ग्रुपमधील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक म्हणजे My Home आहे. जर आपणास हैदराबादमधील सर्वोत्तम घराबद्दल बोलायचे झाल्यास माय होम हे सर्वोत्तम घरांचं प्रोजेक्ट ठरेल. त्यांचे 21 हून अधिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प पूर्ण झालेत, हा एक प्रकारचा विक्रमच आहे.

30 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा

अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट बांधण्याच्या बाबतीत माय होम प्रकल्पाला 30 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. या प्रकल्पात 260 लाख चौरस फुटांमध्ये लक्झरी फ्लॅट्स विक्रीसाठी बनविण्याचा विक्रम आहे. याशिवाय हायटेक सिटीमध्ये 110 लाख स्क्वेअर फूटमध्ये अनेक आलिशान फ्लॅट्सचे बांधकाम सुरू आहे. लाखो चौरस फूट जागेत सदनिका बांधण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. माय होम अंतर्गत सर्व गृहनिर्माण मालमत्तांच्या किमती कालांतराने वाढण्याचा मोठा इतिहास आहे.

खरेदीदारांना चांगल्या सुसज्ज फ्लॅट दिल्याबद्दल अभिमानाची भावना

सर्वात महत्त्वाचे म्हणजे माय होम ग्रुपसाठी किती फ्लॅट विकले ही संख्या वाढवण्याचा फक्त उद्देश नव्हता, तर खरेदीदारांना चांगल्या सुसज्ज फ्लॅट दिल्याबद्दल अभिमानाची भावना आहे. हा ग्रुप आनंदी लोक, चांगले जीवन, कागदोपत्री पारदर्शकता, वेळेवर होम डिलिव्हरी, ठिकाणाची निवड आणि सुरक्षित वातावरण या त्याच्या सहा तत्त्वांवर काम करतो. हेच कारण आहे की, जेव्हा खरेदीचा विचार केला जातो तेव्हा लोकांसाठी माय होम हा सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येतो.

माय होम ग्रुपची दूरदृष्टी

माय होम ग्रुपच्या मते, आमची दृष्टी “जागतिक दर्जाची” राहण्याची आणि कामाची जागा तयार करणारे उपाय विकसित करणे आहे. या दृष्टिकोनाद्वारे “जीवन चांगले बनते.” घरे प्रकाशमान होण्यासाठी जागतिक दर्जाची वीज निर्माण करणे, स्वप्नातील घरे बांधण्यासाठी दर्जेदार सिमेंट तयार करणे आणि दर्जेदार शिक्षण देऊन जीवन समृद्ध करणे हा आमच्या व्हिजनचा भाग आहे.

My Home चा वारसा

वर्ष 1981 मध्ये दैनंदिन जीवनाचा एक नवीन पॅटर्न उदयास आला. हे ते वर्ष होते, जेव्हा एका तरुण डॉक्टरने आपली कौशल्ये रिअल इस्टेट जगतात वापरण्याचे ठरवले. तेव्हाच डॉ. रामेश्वर राव यांनी माय होम कन्स्ट्रक्शन्स या नावाच्या कल्पनेला आकार देण्यास सुरुवात केली. डॉ. रामेश्वर राव यांनी सुरुवातीला निवासी वसाहत आणि नंतर आलिशान फ्लॅट आणि त्यानंतर रिअल इस्टेट, असा संपूर्ण लँडस्केप तयार करण्यात मोठे यश मिळवले. यादरम्यान माय होम प्रकल्प सुरू झाला, ज्याने आज देशात आणि जगात आपली खास ओळख निर्माण केली आहे.

सोमाजीगुडा येथे पहिले निवासी संकुल बांधले

डॉक्टरची कल्पना आणि बाजारपेठेची नाडी जाणण्याची त्यांची उत्तम गुणवत्ता आहे, यामुळे डॉ. रामेश्वर राव यांना माय होम जेएम अपार्टमेंट्स तयार करण्याची प्रेरणा मिळाली. यातून प्रेरणा घेऊन सोमाजीगुडा येथे पहिले निवासी संकुल बांधले. बांधकाम एवढ्यावरच थांबले नाही, तर वारसा पुढे गेला. यानंतर माय होमच्या खात्यात माय होम ज्वेल प्रोजेक्ट आला. 30 लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या मेगा अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प होता आणि 2,016 फ्लॅट्स बांधण्यात आलेत. यासह हैदराबादमध्ये एकामागून एक सुमारे 16 प्रतिष्ठित प्रकल्प कार्यान्वित केले गेलेत, ज्यामध्ये माय होम रेनबो, माय होम नवडवीपा, माय होम टायकून, माय होम हब इत्यादी आज माय होमच्या नावाला असा समृद्ध वारसा आहे, जो अतुलनीय आणि अद्वितीय आहे.

संबंधित बातम्या

तो ‘फुगा’ लवकरच फुटेल; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं क्रिप्टोकरन्सीबद्दल मोठं विधान

Cabinet Decision: मोठी बातमी! सरकारनं 5 किलो मोफत अन्नची योजना मार्च 2022 पर्यंत वाढवली

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.