AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balen Shah : बालेन शाहांकडून नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर, भारताबाबत मोठी घोषणा

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आपलं परराष्ट्र धोरण जाहीर केलं आहे. नव्या परराष्ट्र धोरणामध्ये नेपाळच्या सार्वभौमत्वासोबतच नेपाळच्या आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे.

Balen Shah : बालेन शाहांकडून नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर, भारताबाबत मोठी घोषणा
Balen ShahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 6:09 PM
Share

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आपल्या नव्या परराष्ट्र धोरणाची घोषणा केली आहे. यामध्ये ‘नेपाळ सर्वात आधी’ या सिद्धांताला प्राथमिकता देण्यात आली आहे. नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण हे पूर्वीच्या सरकारच्या तुलनेमध्ये खूप वेगळं आहे. नव्या परराष्ट्र धोरणामध्ये नेपाळच्या सार्वभौमत्वासोबतच नेपाळच्या आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे. सोबतच आम्ही आमच्या शेजारील देशांसोबत समानतेचा संबंध ठेवू असंही बालेन शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळच्या नव्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे नेपाळचं रूपांतर आता बफर स्टेटमधून एका ब्रीजमध्ये होणार आहे. असा पूल जो आर्थिक विकासाच्या आघाडीवर सर्वांशी जोडला जाईल. एवढंच नाही तर आम्ही कोणत्याही लष्करी आघाडीमध्ये सहभागी होणार नाही, अशी घोषणाही यावेळी शाह यांनी केली आहे.

नेपाळकडून आपल्या नव्या परराष्ट्र धोरणाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, आम्ही आमच्या सार्वभौमत्वासोबतच भौगोलिक अंखडता आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊ, सध्या जगभरात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत, त्याचा उपयोग आम्ही नेपाळच्या आर्थिक विकासासाठी करून घेऊ, नेपाळचा विकास हाच आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचं नव्या परराष्ट्र धोरणामध्ये म्हटलं आहे.

आपल्या नव्या परराष्ट्र धोरणात नेपाळने चीन आणि भारताबाबत देखील मोठी घोषणा केली आहे. नेपाळला एक ‘बफर स्टेट’ मध्यस्थ राष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर काढून त्याचं रुपातंर आम्ही अशा ब्रीजमध्ये करू जो ब्रीज भारत आणि चीनला समान पद्धतीने जोडला जाईल. नव्या परराष्ट्र धोरणानुसार आम्ही एक स्वतंत्र, तटस्थ व अलिप्त राष्ट्र म्हणून नेपाळला जागतिक स्तरावर ओळख मिळून देऊ असं बालेन शाह यांनी म्हटलं आहे. आमचं चीन आणि भारतासोबत एक स्वतंत्र असं परराष्ट्र धोरण असेल. शेजारील सर्व देशांसोबत समान जवळीक आणि योग्य ते अंतर ठेवणारं आमचं परराष्ट्र धोरण असेल असंही बालेनशाह यांनी म्हटलं आहे. सध्या नेपाळच्या या नव्या परराष्ट्र धोरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...