AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली स्फोटाबद्दल एनआयएच्या हाती मोठी माहिती, खरा सूत्रधार सापडलाच, अखेर दिल्लीत..

दिललीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. हा स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक खुलासे सातत्याने होताना दिसत असून अनेकांना अटक करण्यात आलीये.

दिल्ली स्फोटाबद्दल एनआयएच्या हाती मोठी माहिती, खरा सूत्रधार सापडलाच, अखेर दिल्लीत..
Delhi Red Fort blast
| Updated on: Nov 17, 2025 | 10:57 AM
Share

10 नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटाने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या अगदी जवळ हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. तपास यंत्रणांच्या तात्काळ लक्षात झाले की, हा स्फोट नसून हा बॉम्बस्फोट आहे आणि याचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता. जम्मू काश्मीरच्या पुलवामापासून ते जैशपर्यंत या स्फोटाचे कनेक्शन पोहोचले. थेट जैशकडून या स्फोटासाठी पैसा पुरवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. 20 पेक्षा अधिक लोक या स्फोटात गंभीर जखमी झाले तर 9 हून अधिक लोकांचा या स्फोटात जीव गेला. या स्फोटाबद्दल हैराण करणारी बाब म्हणजे चक्क  काही डॉक्टरांचा यात समावेश होता. एमडी मेडिसीनसारखे डॉक्टर मागील काही दिवसांपासून कट रचत होते.

पुलवामा येथील रहिवाशी दहशतवादी उमर हा गाडी चालवत होता. त्यांचे टार्गेट दिल्ली लाल किल्ला नव्हे तर अयोध्या, वाराणसी होते. मात्र, घाईघाईत हा स्फोट झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी उमर देखील गाडीत होता. लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ज्या कारमध्ये स्फोट झाला i-20 च्या कार मालकाला अटक केली. हाच या हल्ल्याचा खरा सूत्रधार असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.

बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली i-20 ही कार काश्मीरचा रहिवाली डॉ. उमर नबी याची आहे. धक्कादायक बाब म्हणजे कटात त्याचाही सहभाग होता. एनआयएच्या तपासानुसार, नबी हा कारच्या व्यवहारासाठी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत आला होता. डॉ. उमर उन नबी हा पंपोर जिल्ह्यातील संबूरा येथील रहिवासी आहे. त्याने हा संपूर्ण कट रचला होता. हैराण करणारे म्हणजे तो देखील डॉक्टर आहे.

तपास जसा जसा पुढे जात आहे, तशी या बॉम्बस्फोटाबद्दलही हैराण करणारी माहिती पुढे येतंय. ही गाडी अनेकदा विकण्यात आली आणि खरेदी करण्यात आली. शेवटी खोटी कागदपत्रे देऊन या गाडीचा व्यवहार झाला. ज्यादिवशी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट झाला, त्यावेळी ही i-20 कार दिल्लीत तब्बल 11 तासापासून फिरत होती. मोठी स्फोटके या कारमध्ये होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.