AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्भया बलात्कार प्रकरण : अखेर दोषींच्या फाशीची नवी तारीख ठरली

देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना येत्या 3 मार्चला फाशीवर लटकवण्यात येणार (Nirbhaya rape case Death penalty to accused) आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण : अखेर दोषींच्या फाशीची नवी तारीख ठरली
| Updated on: Feb 17, 2020 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना येत्या 3 मार्चला फाशीवर लटकवण्यात येणार (Nirbhaya rape case Death penalty to accused) आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने याबाबतचा  निर्णय दिला आहे. निर्भया बलात्कारातील नराधमांविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. येत्या 3 मार्चला सकाळी 6 वाजता चारही दोषींना फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला (Nirbhaya rape case Death penalty to accused) आहे.

दोनवेळा फाशी टळली

अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) या चार  दोषी आरोपींची फाशी दोन वेळा टळली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेट वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार या चौघांना 22 जानेवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानुसार 17 जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता. मात्र दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात केल्याने 1 फेब्रुवारीची फाशी टळली होती.

आरोपींना एकत्र फाशी 

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना वेगवेगळी फाशी देण्यात येणार नाही, असे गेल्या सुनावणीदरम्यान वकील वृंदा ग्रोवर यांनी सांगितले होतं. नियमानुसार, कोणत्याही एका प्रकरणी दोषींना वेगवेगळी फाशी दिली जात नाही. जोपर्यंत सर्व दोषींच्या याचिकांवर सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही आरोपींना फाशी दिली जात नाही. या नियमानुसार आता आरोपींना एकत्र फाशी दिली जाणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली (nirbhaya rape case) होती.

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश