AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील 8 कोटी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार, बाइक टॅक्सीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

देशातील 8 कोटी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. बाइक टॅक्सीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील 8 कोटी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार, बाइक टॅक्सीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
nitin gadkari newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 11:41 AM
Share

भारतातील सर्व राज्यात बाईक टॅक्सी धावणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा अॅक्शन प्लान तयार केला आहे. त्यांनी सर्व राज्य सरकारला बाइक टॅक्सीसाठी परवाने जारी करण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी ‘सुरक्षा’ नावाच्या एका कार्यक्रमात बाईक टॅक्सीवर मोठं भाष्य केलं. बाईक टॅक्सी हा केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प असून यामुळे जनतेला नवीन वाहतूक सेवा मिळेल. तसेच 8 कोटी तरुणांना रोजगार निर्माण होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी म्हटलं की, केंद्र सरकारने खासगी टू-व्हीलर स्कूटर आणि बाईकच्या माध्यमातून लोकांना ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देण्यास परवानगी दिली आहे. परंतु काही राज्यांसाठी परमीट जारी करण्यात आलं नाही. परंतु काही राज्य सरकारला विनंती आहे की, टू-व्हीलर , बाईक टॅक्सीसाठी परमीट जारी करावं. जेणेकरून ग्रामाीण भागातील लोकांना रोजगार मिळेल. देशातील सर्व राज्यांना विनंती आहे की, त्यांनी बाइक टॅक्सीचे परमीट जारी करावं. रोजगारासहित लोकांना नवीन ट्रान्सपोर्ट सुविधा मिळेल’.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, ‘सुरक्षा’ कार्यक्रमाअंतर्गत देशातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील बांधकाम, खाणीमध्ये काम करणार्‍यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाईल. यासहित त्यांचं समुपदेशनही केलं जाईल. ही सुविधा कामच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. सर्वात आधी नागपूरच्या कामठी, चंद्रपुरात खाणकाम करणाऱ्या 10000 कामगारांना सुविधा मिळेल. केंद्र सरकारचा चालकांच्या आरोग्यावरही लक्ष आहे. चालकांचे आरोग्य राहिलं तरच रस्त्यांची सुरक्षा कायम राहील. चालकांच्या डोळ्यांची काळजी हा महत्त्वाचा विषय आहे’.

वाहतूक नियमावर गडकरी म्हणाले, ‘वाहतूक नियम लागू करण्यासाठी नियमांचं उल्लंघन करण्यांसाठी नकारात्मक पॉइंट सिस्टिम आणली जाईल. उल्लंघन केल्यास पॉइंट कमी केली जातील. चालकाने मर्यादा ओलांडल्यानंतर संबंधित व्यक्तीचं लायसन्स देखील रद्द होईल. ही व्यवस्था वारंवार नियम मोडणाऱ्यांना जबाबदारीने वाहन चालवण्यास प्रोत्साहन देईल’. रस्ते सुरक्षा आणि रोजगाराबाबतची गडकरींची घोषणा मोठी मानली जात आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक