AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरब्यात बिगर-हिंदूंना बंदी : समाजवादी पार्टीचे नेते एस.टी. हसन मुसलमान मुलांना म्हणाले, हिंदू मुलींना…’

मध्य प्रदेशात गरब्यात बिगर-हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मध्य प्रदेशात घेतला गेला आहे. यावरुन सर्वत्र विविध प्रतिक्रीया येत असताना सापचे नेते एस.टी. हसन यांनीही वक्तव्य केले आहे.

गरब्यात बिगर-हिंदूंना बंदी : समाजवादी पार्टीचे नेते एस.टी. हसन मुसलमान मुलांना म्हणाले, हिंदू मुलींना...'
S.T. HASAN
| Updated on: Sep 22, 2025 | 9:04 PM
Share

नवरात्रोत्सव सुरु होताच युपीत राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु झाले आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात ९ दिवसांपर्यंत नॉन-व्हेजवर बंदी लावण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात हिंदू संघटनांनी घोषणा केली आहे की गरबा आणि दांडिया उत्सवात बिगर-हिंदूंना प्रवेश दिला जाणार नाही. या प्रकरणात आता समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते एस.टी.हसन यांचे वक्तव्य समोर आले आहे.

सपाचे माजी खासदार एस.टी.हसन यांनी नॉन व्हेज वरील बंदी संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले तुम्ही कोण आहात जेवणावर बंदी घालणारे ? मुसलमान तर घरी फ्रीजर ठेवून खातील. परंतू 5 – स्टार हॉटेलातील बीफवर कोण बंदी घालणार ? काय ड्रामेबाजपणा सुरु आहे. नवरात्र आणि कावड यात्रेत मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी मागे खरे तर मतांचे राजकारण सुरु आहे. जर भक्ती आणि श्रद्धा असेल फाईव्ह स्टार हॉटेलातील बीफ विक्रीवर बंदी का नाही ?

बंदी लादणारे तुम्ही कोण – एस.टी. हसन

समाजवादी पार्टीचे नेते हसन यांनी नवरात्री दरम्यान मांस विक्रीवरील बंदीवर कठोर टीका केली आहे. ते म्हणाले की देश सर्वांचा आहे. केवळ मुसलमान नव्हे तर ख्रिश्चन आणि शीख देखील नॉन व्हेज खातात. नवरात्रीत आणि कावड यात्रेत त्यांनी नॉन-व्हेजसाठी कसे रोखले जाऊ शकते. तुम्ही कोण आहात बंदी लादणारे ? हिंदू नवरात्र आणि कावड यात्रेत नॉन-व्हेज खात नाहीत ? असाही सवाल त्यांनी केला.

सपाच्या या माजी खासदाराने आरोप लावताना हे सर्व मतांच्या ध्रुवीकरणासाठी सुरु आहे. फाईव्ह स्टारमधील बीफ विक्री का नाही थांबवत ? एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे धंदा सुरु आहे. भारता जगातला दुसरा सर्वात मोठा बीफ निर्यातदार आहे , मग ही नाटके का सुरु आहेत ?

येथे पाहा पोस्ट –

गरब्यात मुस्लीम मुलांनी जाऊ नये

मध्य प्रदेशातील गरबा उत्सवात बिगर हिंदूंना लावलेल्या बंदीला मात्र त्यांनी पाठींबा दिला आहे. ते म्हणाले की,’ मी या निर्णयाच्या बाजूने आहे. मुसलमानांनी यात सामील होऊ नये. मुसलमान मुलांनी तेथे अजिबात जाऊ नये. मुसलमान मुलांना विनंती आहे की त्यांनी हिंदू मुलींना आपली बहिण समजावे.’ लव्ह जिहादचा मुद्यावर बोलताना हसन म्हणाले की केवळ व्होट पोलरायझेशन करण्यासाठी हा मुद्दा उठवला आहे.

बिहार येथे पीएम मोदीवर टीप्पणी संदर्भात …

हसन म्हणाले की कोणालाही अधिकार नाही कोणाच्या आईबद्दल अपमानजनक बोलण्याचा. पीएम मोदी यांच्या माताजीचा अपमान जो कोणी करत असेल त्याला थांबवून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली पाहीजे.

मोदी-ट्रम्प यांच्या ‘दोस्ती’वर  काय म्हणाले ?

परराष्ट्रनिती संदर्भात बोलताना एस.टी. हसन यांनी केंद्रावर टीका केली. अमेरिकेने एच-1बी व्हिसा शुल्क वाढवल्या प्रकरणात त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. परराष्ट्र निती या सरकारकडे नाहीच. ट्रम्प वारंवार आपला अपमान करत आहेत. आणि पीएम देशाची दीशाभूल करीत आहेत. आपल्या पीएमनी ट्रम्पसाठी कँपेन देखील केले होते. या मैत्री अंतर्गत देशाला चूना लावला जात आहे अशीही टीका त्यांनी केली.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?