केवळ दोन अक्षरांच्या नावाचे स्थानक माहिती आहे का ? देशातील 2 सर्वात छोट्या नावाची स्थानके कोणती ते पाहा…
तुम्हाला माहिती आहे का की भारतात अशी दोन रेल्वे स्थानके आहेत ज्यांची नावे फक्त दोन अक्षरांपासून तयार झाली आहेत? जर नसेल, तर आज जाणून घ्या की सर्वात लहान नावांची रेल्वे स्थानके कोणती आहेत.

भारतीय रेल्वेतून दररोज दोन कोटी प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेच्या माध्यमातून सर्वात स्वस्तात लांबचा प्रवास करता येतो. प्रवाशी त्यांच्या गरजेनुसार हव्या त्या श्रेणीतून प्रवास करत असतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का देशात असे काही रेल्वे स्थानकं आहेत. ज्यांनी नावे केवळ दोन अक्षरांची आहेत. या रेल्वे स्थानकांच्या इतक्या छोट्या नावामागचे कारण काय आहे ? चला तर माहिती घेऊयात भारतीय रेल्वेच्या सर्वात छोट्या नावाची स्थानके कोणती ?
भारतीय रेल्वेने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या छोट्या नावाच्या स्थानकांची माहिती दिली आहे, त्यानंतर युजर्स आणि प्रवाशांमध्ये या दोन अक्षरांच्या छोट्या नावाच्या स्थानकांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर या स्थानकांची नावे काय आहेत हे पाहूयात आणि त्या मागे काही इतिहास आहे का ते पाहूयात…
छोट्या नावाची स्थानके
दोन छोट्या नावाच्या स्थानकांपैकी पहिल्या स्थानकाचे नाव Od (ओड) आहे तर दुसऱ्या स्थानकाचे नाव Ib (इब) आहे. या दोन स्थानकांच्या बाबतीत फार कमी लोकांना माहिती असेल. भारतात लांब नावाची स्थानके देखील आहेत. अनेक स्थानकांची लांबलचक नावे असल्याने त्यांचे इंग्रजी स्पेलिंग लिहिताना कठीण जाते. अशी अनेक स्थानके आहेत. मात्र, दोन अक्षरांची ही दोन स्थानकांचे इंग्रजी स्पेलिंग इतके सोपे आणि युनिक आहे की अनेकांना ते मजेशीर वाटू शकते.
Od स्टेशन कुठे आहे ?
od स्थानकांसंदर्भातील काही खास माहिती आहे का ते जाणून घेऊयात तसेच हे स्थानक नेमके कुठे आहे हे देखील जाणून घेऊयात..
हे स्थानक गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील रतनपुरा विभागात ओड रोड जवळ स्थित आहे.
या स्टेशनचे वेगळे नाव या स्थानकाला प्रसिद्धी देत आहे.
हे एक छोटे ग्रामीण भागातील स्थानक आहे. ज्यामुळे येथे खूपच कमी सुविधा उपलब्ध आहेत.
तिकीट काऊंटर आणि छोटा वेटिंग एरिआ येथे आहे. Od स्टेशनसारखे Ib स्टेशन देखील त्याच्या छोट्या नावामुळे प्रसिद्ध आहे.
इब ( Ib ) स्टेशन नेमके कुठे आहे ?
आता आपण इब स्थानकाची माहिती घेऊयात, हे स्थानक ओडिशा येथे आहे. अनेक प्रवाशांना उत्सुकता आहे की अखेर या स्टेशनचे नाव इब कसे काय पडले ? तर या इब नावामागे कारण या स्थानकाच्या बाजूने इब नावाची नदी वाहत आहे. त्यामुळे त्याचे नाव इब ठेवण्यात आले आहे. येथे केवळ दोनच फलाट आहेत. हे एक छोटे ग्राऊंट स्टेशन आहे. म्हणजे दोन्ही स्थानके त्यांच्या छोट्या नावामुळे प्रसिद्ध आहेत.
येथे वाचा पोस्ट –
Big network. Tiny names! Ib and Od — just two letters each.#DidYouKnow #RailwayFacts pic.twitter.com/lT2A7rvD8G
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 30, 2026
रेल्वे स्थानकाचे नाव कसे ठेवले जाते ?
भारतात सुमारे ७,३४९ ते ७,४६९ रेल्वे स्थानके आहे. अनेक लोकांना वाटत असेल की स्थानकांची नावे कशी ठेवली जातात. रेल्वे स्थानकांची नावे अशीच मनात आले म्हणून ठेवलेली नसतात. अनेकदा स्थानकाची नावे त्या परिसरावरुन ठेवली जातात.तेथील इतिहासाशी संबंधित ही नावे दिलेली असतात. अनकेदा स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने पाठवला जातो.
