AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं

कधी-कधी आयुष्यात अशा घटना घडतात, त्याच्यावर विश्वास बसत नाही. परंतु या घटना आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकतात असाच काहीसा प्रकार एका कुटुंबासोबत घडला आहे. हे कुटुंब एका रात्रीतून श्रीमंत झालं आहे.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं
कुटुंब एका रात्रीतून झालं श्रीमंत Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 3:24 PM
Share

अनेकदा आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो, घराची स्वच्छता करत असताना आपल्याला आपण कधीकाळी चुकीने एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू आणि कालांतराने आपण ती विसरून गेलेलो असतो, अशी एखादी गोष्ट सापडते. ज्यामध्ये जुने नाणी, काही महत्त्वाच्या गोष्ट अशा अनेक गोष्टी असू शकतात. परंतु घराची स्वच्छता करत असताना एका कुटुंबाला जे सापडलं त्या गोष्टीमुळे हे अख्खं कुटुंब एका रात्रीत श्रीमंत झालं आहे. सुरुवातीला तर या कुटुंबाचा विश्वासही बसला नाही, परंतु त्यांच्या हाती मोठा जॅकपॉट लागला होता.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, घराची स्वच्छता सुरू असताना एका कुटुंबातील व्यक्तीच्या हाती त्याच्या आजोबांचं तब्बल तीस वर्षांपूर्वीचं एक बँक पासबुक हाती लागलं आहे. पासबुक सापडल्यानंतर त्या व्यक्तीने मोठ्या उत्सुकतेने ते पासबुक उघडून पाहिलं, त्या पासबुकवरची रक्कम बघून अख्ख्या कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे. या पासबुकवर एक लाख रुपये एसबीआयच्या बँक खात्यात जमा असल्याचं दिसून येत होतं. तीस वर्षांपूर्वीचे एक लाख रुपये म्हणजे आताच्या काळात त्याची किंमत किती असेल याचा विचार करा. जेव्हा कुटुंबातील व्यक्तीने हे पासबुक पूर्ण ओपन केलं तेव्हा त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला कारण या व्यक्तीच्या आजोबाच्या एसबीआयच्या बँकेत केवळ एक लाख रुपयेच नाही तर लाखो रुपये जमा होते.

हा सर्व किस्सा या व्यक्तीने ट्विट केला आहे. तसेच जुन्या बंद झालेल्या बँक खात्यातील पैसे आम्ही काढू शकतो का असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. त्यावर अनेकांनी या व्यक्तीला सल्ला दिल्याचं दिसून येत आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार तुम्ही तुमच्या विसरून गेलेल्या एखाद्या खात्यामधून पैसे काढू शकतात, जर ते खातं तुमच्या एखाद्या मृत नातेवाईकाचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेकडे मृतपत्र सादर करावं लागेल तसेच आपणच त्या बँक खात्याचे अधिकृत वारस आहोत, हे सिद्ध करणारे पुरावेही जमा करावे लागतील, त्यानंतर ती रक्कम तुम्हाला मिळू शकेल असा सल्ला या व्यक्तीला काही युझर्सने दिला आहे.

Follow Us
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया