Petrol Diesel Rate: ज्याची भीती होती तेच घडलं, पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, किमतीत मोठा बदल

Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या असून, ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 91 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दबाव वाढू शकतो. आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Petrol Diesel Rate: ज्याची भीती होती तेच घडलं, पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, किमतीत मोठा बदल
| Updated on: Aug 19, 2026 | 8:31 AM

Petrol Diesel Rate Today:  आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या असून, ब्रेंट क्रूडने प्रति बॅरल 91 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दबाव वाढू शकतो. वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे आणि जागतिक पुरवठ्याबाबत वाढत्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. एक नाही तर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे.

बुधवारी सकाळी, ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल सुमारे 91.40 डॉलर आणि डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव प्रति बॅरल सुमारे 85 डॉलर होता. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल होणारी प्रत्येक 10 डॉलरची वाढ तेल कंपन्यांच्या खर्चावर लक्षणीय परिणाम करते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ होऊनही, भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. देशभरातील काही ठिकाणांचे दर हे स्थिर आहेत पण काही राज्यांमधील दर हे वाढलेले पाहायला मिळत आहे.

या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

  • छत्तीसगडमध्ये पेट्रोलचे दर दोन पैशांनी वाढून 108.08रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • हरियाणात पेट्रोलचे दर 31 पैशांनी वाढून 103.28 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोलचे दर 64 पैशांनी वाढून 103.25 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • जम्मू आणि काश्मीरमध्ये पेट्रोलचे दर 1.16 रुपयांनी कमी होऊन 104.13 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • लडाखमध्ये पेट्रोलचे दर 23 पैशांनी कमी होऊन 108.78 रुपये प्रति लिटर झाले आहेत.

या राज्यांमध्ये डिझेलच्या दरात वाढ

  • छत्तीसगडमध्ये डिझेलचे दर तीन पैशांनी वाढून 101.35 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • हरियाणात डिझेलचे दर 30 पैशांनी वाढून 95.94 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • हिमाचल प्रदेशमध्ये डिझेलचे दर 69 पैशांनी वाढून 95.21 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • जम्मू आणि काश्मीरमध्ये डिझेलचे दर 94 पैशांनी कमी होऊन 92.81 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
  • लडाखमध्ये डिझेलचे दर 22 पैशांनी कमी होऊन 93.91 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us