AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate: तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड वाढल्या किमती, आता पेट्रोल-डिझेलचे दर…

Crude Oil Rate: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये अचानक शुक्रवारी कपात केली होती. यानंतर आता आज तेलाच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली आहे.

Petrol Diesel Rate: तेलाच्या भावात मोठा बदल, धाड धाड वाढल्या किमती, आता पेट्रोल-डिझेलचे दर...
| Updated on: Aug 18, 2026 | 8:20 AM
Share

Petrol Diesel Price: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये अचानक शुक्रवारी कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आता शून्य रुपये झाले. मात्र, याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर पाहायला मिळालेला नाही. आता मात्र आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली की नाही ते पाहा.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 91 डॉलरवर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज, 18 ऑगस्ट 2026 रोजी, देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) ऑगस्ट महिन्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

पेट्रोल निर्यातीवरील शुल्क 14 ऑगस्ट 2026 पासून कमी करून शून्य करण्यात आले. यापूर्वी हे 3.5 रुपये प्रति लिटर होते. डिझेलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कचा दर आता 25.5 रुपये प्रति लिटरवरून घसरला. तो आता 24 रुपये प्रति लिटर झाला आहे. विमान इंधनच्या निर्यातीवरील एसएईडी पूर्वीच्या 22 रुपये प्रति लिटर होता. आता तुलनेत कमी करून 19.5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. सरकार देशांतर्गत पुरवठा कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी हा टॅक्स लावत असतात.

महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्यांचे दर:

दिल्ली: पेट्रोल ₹102.12/लिटर | डिझेल ₹95.20/लिटर

कोलकाता: पेट्रोल ₹113.51/लिटर | डिझेल ₹99.82/लिटर

मुंबई: पेट्रोल ₹111.21/लिटर | डिझेल ₹97.83/लिटर

चेन्नई: पेट्रोल ₹107.77/लिटर | डिझेल ₹99.55/लिटर

भारतीय बाजारात तेल विकणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी मे महिन्यात चार वेळा दरवाढ केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 25 मे 2026 रोजी झाला होता. पेट्रोल डिझेलचे दर प्रत्येक राज्यानुसार वेगळे असतात. कुठे जास्त तर कुठे कमी पाहायला मिळतो. आता पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही महिन्यात वाढले नसल्यामुळे आता लोकांना दिलासा मिळाला आहे. हा दिलासा किती दिवस टिकून राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात