Petrol Diesel Price Today: पेट्रोलवरील ‘स्पेशल टॅक्स’ शून्य होताच दर घसरले? आजचा नवीन रेट काय?
Petrol Diesel Price Today: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये शुक्रवारी कपात केली. त्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वाचा आजचा दर...

Petrol Diesel Price Today: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या अचानक करांमध्ये शुक्रवारी कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आता शून्य रुपये झाले आहे. मात्र, याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर आज दिसून आलेला नाही. तेलाच्या किमती जुन्या पातळीवरच कायम आहेत. मुंबईत आज रविवार १६ ऑगस्टला डिझेलचा रेट ९७.८३ रुपये प्रति लिटरच आहे.
आधी किती द्यावा लागायचा टॅक्स (Petrol Diesel SED)
पेट्रोल निर्यातीवरील शुल्क १४ ऑगस्टपासून कमी करून शून्य करण्यात आले आहे. यापूर्वी हे ३.५ रुपये प्रति लिटर होते. डिझेलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (एसएईडी)चा दर आता २५.५ रुपये प्रति लिटरवरून घसरून २४ रुपये प्रति लिटर झाला आहे. विमान इंधन (एटीएफ)च्या निर्यातीवरील एसएईडी पूर्वीच्या २२ रुपये प्रति लिटरच्या तुलनेत कमी करून १९.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. हा टॅक्स तेव्हा लागतो जेव्हा कंपन्या परदेशात एक्सपोर्ट करतात. सरकारे देशांतर्गत पुरवठा कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी हा टॅक्स लावत असतात.
डिझेलचा काय आहे रेट (Diesel Price Today)
मुंबई – ९७.८३ रुपये
नवी दिल्ली – ९५.२० रुपये
कोलकाता – ९९.८२ रुपये
चेन्नई – ९९.५५ रुपये
गुरुग्राम – ९५.६४ रुपये
नोएडा – ९५.४४ रुपये
बंगळुरू – ९९.५६ रुपये
भुवनेश्वर – १०२.१५ रुपये
चंदीगड – ९४.०८ रुपये
हैदराबाद – १०३.५८ रुपये
जयपूर – ९७.७८ रुपये
लखनौ – ९५.७९ रुपये
पटना – ९९.३६ रुपये
तिरुअनंतपुरम – १०३.६४ रुपये
पेट्रोलचा काय आहे रेट (Petrol Price Today)
मुंबई – १११.२१ रुपये
नवी दिल्ली – १०२.१२ रुपये
कोलकाता – ११३.५१ रुपये
चेन्नई – १०७.७७ रुपये
गुरुग्राम – १०२.९७ रुपये
नोएडा – १०१.९६ रुपये
बंगळुरू – १११.६८ रुपये
भुवनेश्वर – १०८.४९ रुपये
चंदीगड – १०२.०१ रुपये
हैदराबाद – ११५.४३ रुपये
जयपूर – ११२.६९ रुपये
लखनौ – १०२.३१ रुपये
पटना – ११३.३७ रुपये
तिरुअनंतपुरम – ११४.८० रुपये
इराण आणि ओमानकडे नजर
शुक्रवारी ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. २.२ टक्के घसरून स्टॉक ८७ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर आला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा रेट ८१ डॉलर प्रति बॅरल आहे. इराण आणि ओमान यांच्यातील करारावर जगाची नजर आहे. जोपर्यंत तिथून कोणती चांगली बातमी येत नाही तोपर्यंत क्रूड ऑइलच्या किमती जवळपास याच पातळीवर राहतील.
