Petrol Diesel Rate: सरकारने मध्यरात्रीच घेतला मोठा निर्णय, आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले?
Petrol Diesel Price Today: पेट्रोल डिझेलच्या किमतींंबाबत एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. मध्यरात्री सरकारने असा निर्णय का घेतला ते जाणून घ्या...

Petrol Diesel Rate Today: सरकारने गुरुवारी रात्री उशिरा पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्सबाबत एक मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने पेट्रोलवरील निर्यात कर ₹२ ने वाढवून प्रति लिटर ₹२.५० केला आहे, तर डिझेलवरील शुल्क ₹16 वरून कमी करून प्रति लिटर ₹८.५० केले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे नवीन दर आज, १६ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले आहेत. याचा देशांतगर्त इंधनाच्या किमतीत काय फरक पडणार आहे की नाही ते जाणून घ्या…
सरकारच्या निर्णयानुसार, पेट्रोल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स आता प्रति लिटर ₹२.५० दराने आकारला जाईल. डिझेल निर्यातीवरील कर प्रति लिटर ₹७.५० ने कमी करण्यात आला आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या निर्यातीवरील शुल्कात कोणताही बदल झालेला नाही.
या निर्णयाचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर थेट परिणाम होणार नाही. सरकारने देशांतर्गत वापरासाठी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या शुल्कात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे, केवळ निर्यात करातील बदलांच्या आधारावर सामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील की कमी होतील, हे सांगणे योग्य ठरणार नाही.
विंडफॉल टॅक्समध्ये रात्रीतून झालेल्या बदलानंतर, एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएलने शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आज मुंबईत १ लिटर पेट्रोलचा दर ₹१११.२१ आणि डिझेलचा दर ₹९७.८३ वर स्थिर आहे. याचा अर्थ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींमधील चढ-उतार विचारात घेण्यासाठी सरकार दर १५ दिवसांनी विंडफॉल टॅक्सच्या दराचा आढावा घेते. इंधनाची निर्यात आणि देशांतर्गत उपलब्धता यांच्यात संतुलन राखणे हा या कराचा उद्देश आहे.
भारताने जुलै २०२२ मध्ये इंधन निर्यातीवर विंडफॉल टॅक्स (विंडफॉल कर) प्रथम लागू केला आणि दोन वर्षांनंतर तो मागे घेतला. त्यानंतर इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर सरकारने मार्च २०२६ मध्ये विंडफॉल टॅक्स पुन्हा लागू केला.
