AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजधानी हादरली, धावत्या स्लीपर बसमध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार

रागात घरातून निघालेल्या मुलीसोबत असं काही घडलं, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बसमध्ये चढलेल्या मुलीवर ड्रायव्हर - कंडक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे... पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

राजधानी हादरली, धावत्या स्लीपर बसमध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार
| Updated on: Aug 31, 2026 | 2:49 PM
Share

देशात घडत असलेल्या धक्कादायक घटनांनंतर महिलांची सुरक्षा खरंच वाऱ्यावर आहे… हे स्पष्ट होत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसागणिक वाढ होत आहे. आता देखील एक मन सुन्न करणारी घटना समोर येत आहे. राजधानी दिल्लत स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपात बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली येथील काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 4 ऑगस्टच्या रात्री घडल्याचं सांगितलं जात असून पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक करण्यात आली आहे. पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी असून ती अकरावीत शिकत आहे. कुटुंबियांवर नाराज असल्याने विद्यार्थिनीने आपल्या कोणालाच काहीच न कळवता घर सोडलं आणि ती नोएडातील तिच्या चुलत बहिणीच्या घरी जायला निघालेली.

नोयडा येथे जात असताना विद्यार्थिनी चुकून परी चौकात उतरली त्याचवेळी एक रिकामी स्लीपर बस तिथून जात होती, त्यावेळी विद्यार्थिनीने नोएडा सेक्टर 63 ला जात आहे… म्हणून बस मध्ये बसली… बसमध्ये तिच्यासोबत असं काही घडेल, याची तिने कल्पना देखील केली नव्हती. बस सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात कंडक्टरने पीडितेसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

कंडक्टर येथेच थांबला नाही, त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला आणि प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, कथित आरोपींनी विद्यार्थिनीला रात्री उशिरा काश्मिरी गेट बस स्थानकाजवळ रिंग रोडवर उतरवले आणि ते फरार झाले. अखेर घाबरलेल्या विद्यार्थिनीने काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

परी चौकात बसमध्ये चढल्यानंतर, कश्मिरी गेटपर्यंत 47 किलोमीटरपर्यंत… हा धक्कादायक प्रकार सुरु होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना तिमारपूर येथील एका बस पार्किंगमधून अटक केली आहे. शिवाय स्लीपर बस देखील ताब्यात घेतली असून, बसची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे… याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा