AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड घरापासून थोडं दुरच लावा, कायम असतो सापांचा डेरा, एखादा तरी साप दिसणारच

अशी काही झाडं असतात, जी झाडं आपल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशा झाडांखाली अनेकदा साप आढळून येतात. अशी झाडे बागेत किंवा घरामध्ये लावताना काळजी घेतली पाहिजे.

हे झाड घरापासून थोडं दुरच लावा, कायम असतो सापांचा डेरा, एखादा तरी साप दिसणारच
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 9:45 PM
Share

अनेकांच्या मनात सापांबद्दल उत्सुकता असते, मात्र तेवढीच भीती देखील असते. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. परंतु यातील सर्वच प्रजाती या काही विषारी नसतात. मात्र दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो, असा गैरसमज आपल्या मनात असल्यामुळे आपण साप दिसला की त्याला लगेच मारतो. असं न करता जर तुमच्या सोसायटीमध्ये, घरात किंवा बागेत कुठेही साप आढळून आल्यास त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते सापांना त्याच्या सुक्षित अधिवासामध्ये सोडतील. भारतामध्ये सापांच्या केवळ चारच प्रजाती या विषारी आहेत, ज्यामध्ये कोबरा, मण्यार, फुरसे, घोणस या चार जातींचा समावेश होतो. ज्याला बीग फोर असं देखील म्हटलं जातं.

साप घरात येऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जसं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बागेमध्ये गवत न वाढू देणं, बागेत स्वच्छता ठेवणं, त्याच सोबत घरात देखील अशा काही जागा असतात, जिथे साप सहज लपू शकतो. त्यामुळे अशा जागा शोधून तिथे कुठलीही अडचण नसेल याची खात्री करणं असे विविध उपाय आपण करू शकतो. परंतु असे देखील काही झाडं असतात, जी झाडं त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशी झाडं शक्यतो घरापासून थोडीच दूरच लावावीत.

यातीच एक झाड आहे, ते म्हणजे कन्हेराचं झाडं. या झाडाला सुंदर अशी लाल फुलं येतात. परंतु या झाडाकडे साप लवकर आकर्षित देखील होतात. याचं कारण म्हणजे या झाडाच्या मुळांशी कायम ओल असते, कारण या झाडाला शेंड्यापासून ते थेट खाली मुळापर्यंत दाट पानं असतात. लपण्यासाठी जागा आणि कायम ओल असल्यामुळे या झाडाच्या अवतोभोवती उंदीर, घुशी, बेडूक असे प्राणी सतत येतात.  त्यामुळे या ठिकाणी सापं देखील येतात, कारण त्यांना इथे सहज शिकार सापडते. तसेच या झाडाभोवतालची जमीन भुसभुशीत असल्यामुळे अनेकदा उंदीर या ठिकाणी बीळं देखील करतात. सापांना या ठिकाणी आयती बीळं देखील मिळतात, त्यामुळे अशा झाडांच्या परिसरात अनेकदा साप आढळून येतात.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष