हे झाड घरापासून थोडं दूरच लावा; रात्री असतो सापांचा अड्डा, घरातही घुसू शकतो साप

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी घुसल्यामुळे साप जमिनीवर येतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो. अशी देखील काही झाडं आहेत, जी सापांना आपल्यासाठी सुरक्षित निवारा वाटत असल्यामुळे ते अशा झाडांकडे आकर्षित होतात.

हे झाड घरापासून थोडं दूरच लावा; रात्री असतो सापांचा अड्डा, घरातही घुसू शकतो साप
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 02, 2026 | 10:13 PM

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक वाढतो, कारण पावसाळ्यात साप बिळात कमी आणि जमिनीवर जास्त फिरताना दिसतात. तुम्ही अनेकदा पावसाळ्यात तुमच्या घराच्या आसपास साप निघाल्याचं पाहायलं असेल, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं त्यामुळे ते बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, जिथे साप निघण्याचा धोका जास्त असतो, जसं की ट्रेक करताना किंवा शेतात फिरताना अशा ठिकाणी पायात नेहमी शुज घालावेत ज्यामुळे तुमचं सर्पदंशापासून संरक्षण होऊ शकेल. आणि जर समजा तुम्हाला कुठे साप दिसलाच तर त्याला मारू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका तर त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित जागी सोडतील.

दरम्यान अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे साप तुमच्या घरात येऊ शकतात. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात मोकळ्या जागेत किंवा जर तुमची बाग असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात गवत वाढते, गवत वाढल्यामुळे सापांना लपण्यासाठी जागा सापडते, त्यामुळे अशा ठिकाणी सापांचा नेहमीच वावर असतो, त्यामुळे पावसाळ्याच्या काळात कधीही घराभोवती जास्त गवत वाढू देऊ नये, परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.

तसेच काही झाडं अशी देखील आहेत, ज्या झाडांकडे साप आपोआप आकर्षित होतात, कारण अशा झाडांच्या मुळाशी किंवा खोडात, पानात लपण्यासाठी सापांना सुरक्षित जागा सापडते. काही झाडांचा रंग तर असा असतो की जवळ गेल्याशिवाय साप देखील दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अशी झाडं घराशेजारी लावताना काळजी घेतली पाहिजे.

नाग चाफ्याचं झाड देखील असंच एक झाड आहे. हे झाड जास्त उंच वाढत नाही, परंतु या झाडाच्या पानांचा आकार हा खूप लांब लांब असतो, तसेच हे झाड जमिनीवर मोठ्या प्रमाणात पसरते त्यामुळे तिथे अडचण निर्माण होतो. पावसाळ्याच्या काळात या झाडांच्या पानाखाली मोठ्या प्रमाणात आद्रता निर्माण होत असल्याने सापांना लपण्यासाठी अनुकून परिस्थिती असते, त्यामुळे अनेकदा या झाडाच्या आसपास साप आढळून येतात, त्यामुळे शक्यतो हे झाड घरापासून थोड दूर लावावं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us