AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदींचा जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद, ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारत आण युरोपियन यूनियन यांच्यातील व्यापार करार यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल मोदी यांनी मेलोनी यांचे आभार मानले.

PM मोदींचा जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
narendra-modi-italian-pm-giorgia-meloni
| Updated on: Sep 10, 2025 | 7:22 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी भारत आण युरोपियन यूनियन यांच्यातील व्यापार करार यशस्वी करण्यास मदत केल्याबद्दल मोदी यांनी मेलोनी यांचे आभार मानले. आज दोन्ही नेत्यांनी गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, स्पेस, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि दहशतवाद यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये असलेल्या करारांबाबत चर्चा केली आणि आगामी काळातील रणनीतीवर प्रकाश टाकला.

दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?

आज दोन्ही नेत्यांनी 2025 ते 2029 या काळालीत धोरणात्मक कृती आराखड्यावर चर्चा करत पार्टनरशीप आणखी वाढवण्याबाबत भाष्य केले. जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत झालेल्या फोन कॉलची माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ” इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. भारत-इटली यांच्यातील धोरणात्मक पार्टनरशीप आणखी मजबूत करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपावा याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. भारत आणि युपोपियन युनियनमधील व्यापार करार पूर्ण करण्यासाठी आणि आयएमईईईईसी उपक्रमाद्वारे कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीच्या सक्रिय पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मेलोनी यांचे आभार.”

जूनमध्ये मोदी-मेलोनी यांची झाली होती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची नेहमीच चर्चा होत असते. कॅनडामध्ये जून महिन्यात जी 7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या संभाषणात मेलोनी आणि पंमोदी यांच्यातील मैत्री स्पष्टपणे दिसून आली होती. मेलोनी यांनी म्हटले होते की, ‘पंतप्रधान मोदी हे’बेस्ट’ आहेत. मी त्यांच्यासारखी बनण्याचा प्रयत्न करत आहे.’

जी 7 शिखर परिषदेत झालेल्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीबद्दल X वर एक पोस्ट देखील शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, “इटलीसोबत भारताची मैत्री आणखी मजबूत होत राहील, ज्याचा आपल्या लोकांना खूप फायदा होईल!”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...