काँग्रेसची हीच मानसिकता, त्यांच्यासाठी ओसामा शांतीदूत होता, मोदींचा घणाघात

धार, मध्य प्रदेश : पुलवामा हल्ला हा एक अपघात होता असं म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाचार घेतलाय. दिग्विजय सिंह यांचं गृहराज्य असलेल्या मध्य प्रदेशातील धारमध्ये पंतप्रधान मोदींनी विजय संकल्प रॅलीला संबोधित केलं. पुलवामा हल्ला हा या महाशयांना अपघात वाटतो. यांनाच जगातला सर्वात घातक दहशतवादी ओसामा बिन लादेनही शांतीदूत वाटायचा, …

काँग्रेसची हीच मानसिकता, त्यांच्यासाठी ओसामा शांतीदूत होता, मोदींचा घणाघात

धार, मध्य प्रदेश : पुलवामा हल्ला हा एक अपघात होता असं म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाचार घेतलाय. दिग्विजय सिंह यांचं गृहराज्य असलेल्या मध्य प्रदेशातील धारमध्ये पंतप्रधान मोदींनी विजय संकल्प रॅलीला संबोधित केलं. पुलवामा हल्ला हा या महाशयांना अपघात वाटतो. यांनाच जगातला सर्वात घातक दहशतवादी ओसामा बिन लादेनही शांतीदूत वाटायचा, असं म्हणत मोदींनी दिग्विजय सिंहांचा समाचार घेतला.

काँग्रेस नेत्यांकडून एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले जात आहेत. दिग्विजय सिंह यांनीही पुरावे मागितले होते. हाच धागा पकडत मोदी म्हणाले, ज्या पक्षाने सर्वात जास्त काळ देशावर राज्य केलं, ज्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या शौर्यवान सैन्याचे हात बांधून ठेवले, तेच नेते आता आपल्या जवानांच्या सामर्थ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचे एक नेतेही पुढे आहेत. या महाशयांनी पुलवामा हल्ला हा एक दुर्घटना असल्याचं म्हटलंय.”

“काँग्रेसची हीच मानसिकता”

“हे नेते असंच बोलत नाहीत, हीच यांची मानसिकता आहे. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी हे हल्ल्याला दुर्घटना म्हणतात. पुलवामामध्ये झालेला हल्ला हा अपघात होता का? हे तेच नामदार कुटुंबातले आहेत, ज्यांना दहशतवादी ओसामा बिन लादेन शांतीदूत वाटत होता. हेच ते महाशय आहेत, ज्यांनी मुंबई हल्ल्यानंतरही पाकिस्तानला क्लीनचिट दिली होती आणि तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला होता,” असा घणाघात मोदींनी केला.

दिल्लीतील बटला हाऊस एनकाऊंटरचाही उल्लेख मोदींनी केला. “बटला हाऊस एनकाऊंटर झाला तेव्हा अशाच एका राजदरबारी नेत्याने सांगितलं होतं, की रिमोटने सरकार चालवणाऱ्यांचे अश्रू दहशतवाद्यांना मारल्यामुळे थांबत नव्हते. या काँग्रेसकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो का की ते दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करतील? हे लोक सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर शंका घेतात. यांचं सरकार असताना हे प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मौन बाळगायचे. यांचा तोच चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. एअर स्ट्राईक पाकिस्तानवर झालाय, पण दणका यांना बसलाय,” असं मोदी म्हणाले.

“विरोधकांचा चेहरा पाहा, असा चेहरा पाडून बसलेत, जसा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. भारतात महाभेसळ करणारे लोक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महाभेसळ करत आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करत आहेत. मोदीला शिव्या दिल्या तर पाकिस्तानमध्ये टाळ्या वाजतात. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर यांचे चेहरे दाखवले जातात. आजकाल ही महाभेसळ पाकिस्तानची पॉस्टर बॉय बनली आहे,” अशी टीका मोदींनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *