अमेरिका-इराणमध्ये तणाव, मोदींचा ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.

अमेरिका-इराणमध्ये तणाव, मोदींचा ट्रम्प यांना फोन
या पत्रकार परिषदेत विदेशी मीडिया पंतप्रधान मोदींना इंग्रजीत प्रश्न विचारत होते. तर त्यांच्या प्रश्नांवर मोदी हिंदीत उत्तरं देत होते.
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 9:35 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला (PM Modi Calls Donald Trump). नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी सोमवारी (6 जानेवारी)सायंकाळी ट्रम्प यांना फोन केला, यावेळी दोघांनीही एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, भारत-अमेरिका संबंधांवरही यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांचे संबंध आधीपेक्षा मजबूत झाले आहेत, एकमेकांवरील विश्वासामुळे ते आणखी दृढ होत आहेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले (PM Modi Calls Donald Trump).

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळात संबंध मजबूत झाले आहेत. जे एकमेकांवरील विश्वासामुळे आणखी घट्ट होतील.

2019 मध्ये दोन्ही देशांनी खूप प्रगती केली, ज्यामुळे दोन्ही देशांची मैत्री घट्ट झाली आहे, असं मोदी म्हणाले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधानांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशाचे संबंध अधिक चांगले होत असल्याचं सांगितलं.

PM Modi Calls Donald Trump

VIDEO :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.