रावण दहनानंतर PM मोदींनी सांगितले देशाचे तीन शत्रू

रावणदहनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात देशासमोरील 3 आव्हानांचा उल्लेख केला. देशाचा मान-सन्मान, सामाजिक एकता आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी देशवासीयांना कोणते आवाहन केले?

रावण दहनानंतर PM मोदींनी सांगितले देशाचे तीन शत्रू
Narendra Modi Dussehra Speech
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 10:58 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या निमित्ताने देशवासीयांना एकजुटीचं आवाहन केलं. दिल्लीतील आयपी एक्स्टेंशन परिसरातील डीडीए उत्सव मैदानावर दसरा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होत मोदी यांनी रावणदहन केलं. त्यानंतर भाषण करताना त्यांनी देशासमोरची 3 मोठी आव्हानं सांगितली. देशाचा मान-सन्मान कमी करणाऱ्या शक्ती, समाजात फूट पाडणारे लोक आणि भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारी मानसिकता, हे देशाचे शत्रू असल्याचं मोदी यांनी म्हटलं.

मोदींनी सांगितले देशाचे 3 शत्रू

देशाची प्रतिष्ठा आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं असल्याचं मोदी यांनी सांगितलं. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. अन्यायाविरोधात उभं राहण्याची शिकवण या सणातून मिळते, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...

रामराज्य म्हणजे नेमकं काय?

भगवान श्रीराम यांच्या आदर्शांचा उल्लेख करत मोदी यांनी रामराज्याचा अर्थही स्पष्ट केला. रामराज्यात कोणाशीही भेदभाव केला जात नाही, सर्वांना न्याय मिळतो आणि प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी मिळते, असं ते म्हणाले. सरकारने केवळ सत्ता चालवण्यापुरतं मर्यादित न राहता जनतेच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. गरीब आणि वंचित लोकांची सेवा करणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आत्मनिर्भर भारतासाठी म्हणाले…

आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भगवान श्रीराम यांनी लोकांच्या मदतीने लंकेपर्यंतचा प्रवास केला, याचा दाखला देत त्यांनी एकत्रित प्रयत्नांचं महत्त्व पटवून दिलं. देशासमोर कितीही मोठं आव्हान असलं, तरी स्वतःच्या ताकदीवर त्याचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

दसऱ्याच्या सणातून सत्य आणि धर्माच्या विजयाचा संदेश मिळतो, असंही मोदी म्हणाले. आव्हान कितीही मोठं असलं, तरी योग्य बाजूने उभं राहणं महत्त्वाचं आहे. देशाची एकता आणि संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन त्यांनी केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us