Video: राहुल गांधींपुढेच मोदींची मिमिक्री, त्या एका अॅक्शनमुळे नवा वाद; भर मंचावर काय घडलं?
Video: राहुल गांधीं यांच्या पुढेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करण्यात आली. परंतु यातील एका अॅक्शनमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

मध्य प्रदेशात इंदूरच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केलं. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भारतातील व्यवस्थेला विद्यार्थी नव्हे, तर अंधभक्त हवेत, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याच कार्यक्रमात एका तरुणाने राहुल गांधींसमोर पंतप्रधान मोदींची मिमिक्री केली. परंतु आता या मिमिक्रीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या मिमिक्रीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रीचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री मंत्री शोभा करंदलाजे यांनी राहुल गांधींसमोर करण्यात आलेल्या मिमिक्रीवर आक्षेप घेतला आहे. या मिमिक्रीवरून मंत्री शोभा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी म्हटलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यावरील राहुल गांधी यांची प्रतिक्रिया देखील निंदनीय आहे. लोकशाहीत राजकीय मतभेद हे नैसर्गिक आहेत. परंतु या वादात दिवगंत आईला ओढून संवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या आहेत. खरंतर भारतीय मूल्यांमध्ये आईला सर्वोच्च आदर दिला जातो. त्यामुळे सार्वजनिक जीवनातही सन्मान, संयम आणि आदर राखायला पाहिजे’.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीविषयी आक्षेपार्ह शब्दाचा वापर करण्यात आला. यानंतर राहुल गांधी यांना हसू आलं. ही घटना निंदनीय आहे. आई हा राजकारणाचा विषय नाही. परंतु पंतप्रधान मोदींच्या दिवगंत आईबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारल्यानंतर हसू येतंय, यातून त्यांचे राजकीय संस्कार दिसून येत आहे. राजकीय विरोधांसाठी सर्व मर्यादा ओलांडणे, यास लोकशाही म्हणत नाही. देशातील मातृशक्ती पाहत आहे. ही उपाहासात्मक बाब स्वीकारण्यासारखी नाही’.
The objectionable remark about the late mother of Honourable Prime Minister Shri @narendramodi Ji, and Rahul Gandhi’s reaction to it, are deeply condemnable.
Political differences are natural in a democracy, but dragging a departed mother into political discourse crosses all… pic.twitter.com/C2J8KRkUxK
— Shobha Karandlaje (@ShobhaBJP) September 19, 2026
या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी पुढे म्हणाले, अंधभक्त म्हणतात, भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही. पुढे म्हणतात, विकास नकोय. मोदी हे विष्णूंचा अवतार आहे. परंतु अंधभक्त हे प्रश्न कधीच विचारत नाही. शाळांची अवस्था अशा का झाली, याचा सवाल करत नाही. पेपरफुटी का होत आहे, याचा प्रश्न करत नाही. यावर विद्यार्थी हे प्रश्न विचारतात, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली.