AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्र्यांमध्ये वाजलं, भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्र्यांमध्ये जोरदार वाजलं आहे. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्र्यांमध्ये वाजलं, भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?
bjp latest newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 10:40 AM
Share

मध्य प्रदेशमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यात आदिवासी समाजाची खरांवर हातोडा फिरवण्यावरून भाजपमध्येच वाद झाला आहे. या घटनेवरून दोन दिग्गज नेते आमने-सामने आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांना फोन करून विरोध दर्शवला. मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या विरोधातच भाष्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला. ते घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी वन विभाग, प्रशासनाचा कोणताही बडा अधिकारी नव्हता. त्यामुळे शिवराज नाराज झाले. मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अशोक वर्णवाल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेवाल यांनाही फोन करून गोरगरीबांचे घर तोडल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी लवकरच मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं की, गरीब कुटुंबीयांना बेघर करणाऱ्यांना सोडणार नाही. ज्या कुटुंबाचे घरे तोडली, त्यांच्यासाठी नवीन घरे बांधून देऊ. त्यांना कायमस्वरुपी घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत त्यांना तात्पुरता निवारा, अन्न धान्याची सोय केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या कुटुंबांनी भाजपला मदत केली, त्यांच्याच घरावर हातोडा का फिरवला जात आहे, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. शिवराज सिंह यांचे पूत्र कार्तिकेय सिंह चौहान यांनी 13 ऑक्टोबर रोजी कोस्मी दौरा केला. त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बसून जेवण केलं. शिवराज सिंह चौहान यांनी हस्तक्षेप केल्याने मुख्यमंत्री मोहन यादव यांना या प्रकरणावर उत्तर द्यावे लागले. मध्य प्रदेशात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने चर्चांना उधाण आलं. यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव यांचंही टेन्शन वाढलं आहे. त्यांना केंद्रीय मंत्र्यांचा विरोध मुख्यमंत्री यादव यांना झेलावा लागत आहे.

Follow Us
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...