AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जर तिकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे..’, युद्धविरामानंतर मोदींचा पुन्हा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिनंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली.

'जर तिकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे..', युद्धविरामानंतर मोदींचा पुन्हा पाकिस्तानला इशारा
| Updated on: May 11, 2025 | 10:02 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थिनंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेन्स यांच्याशी चर्चा करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारत जोरदार प्रत्युत्तर देईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर व्हेन्स यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेडी वेन्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला, त्यांच्याशी चर्चा केली.यावेळी वेन्स यांच्याशी बोलताना मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे, जर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना कठोर प्रत्युत्तर देऊ असं मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान जर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही तर आम्ही देखील संयम राखू असंही यावेळी भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान वेन्स यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी देखील यावेळी चर्चा केली.

भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केली आहे, युद्धविरामाची घोषणा करतानाच पाकिस्तानला इशारा देण्यात आला आहे. जर पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केलं तर त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली, ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, युद्धविरामाच्या घोषणेनंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन केलं आहे. भारतानं दहशतवादाविरोधात देखील कठोर भूमिका घेतली आहे, दहशतवादासंदर्भात कोणतीही तडजोड होणार नाही असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे.

Follow Us
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ