AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PWD इंजिनिअरला बायकोने मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, मेहुण्याकडून भावोजीचं सिक्रेट ओपन

ऑक्टोंबर 2025 मध्ये दीवाळीला गौतम मीणा आपल्या कुटुंबासोबत गावी गेला होता. तिथे त्याने घराच्या साफसफाईच्या बहाण्याने मोलकरणीला बोलावलं. अनुने स्वत:च्या घरात सीसीटीव्ही सुद्धा बसवले होते. त्याचा एक्सेस तिच्या मोबाइलमध्ये होता.

PWD इंजिनिअरला बायकोने मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, मेहुण्याकडून भावोजीचं सिक्रेट ओपन
Anu Meena
| Updated on: May 25, 2026 | 3:10 PM
Share

अनु मीणा प्रकरणात एक नवीन बाजू समोर आली आहे. अनुचे पती गौतम मीणा PWD विभागात इंजिनिअर पदावर आहेत. दीड महिन्यापूर्वीच हे प्रकरण आहे. गौतम मीणा यांची पत्नी अनु मीणा यांनी आपलं जीवन संपवलं. अनुच्या भावाने आपल्या भावोजींवर गंभीर आरोप केला आहे. गौतम मीणा यांचे त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. अनु म्हणजे गौतम यांच्या पत्नीने दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं होतं. गौतम अनुला आधीपासूनच मारहाण करायचे. पण पतीला मोलकरणीसोबत रंगेहात पकडल्यानंतर मारहाणीचं हे प्रमाण अजून वाढलं. पतीचे हे असे धंदे आणि वारंवार होणारा अपमान याला कंटाळून अनुने स्वत:च जीवन संपवून घेतलं.राजस्थानची राजधानी जयपूरमधील 7 एप्रिल 2026 चे हे प्रकरण आहे.

मृत अनुचा भाऊ नीरज मीणाने मुहाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पतीला मोलकरणीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं हे अनुच्या मृत्यूचं मुख्य कारण आहे असा मृताच्या नातेवाईकाचा आरोप आहे. त्यानंतर मारहाणीच प्रमाण अजून वाढलं. मृत अनुचा भाऊ नीरज मीणाने पोलिसांना दिलेल्या रिपोर्टमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे. ऑक्टोंबर 2025 मध्ये दीवाळीला गौतम मीणा आपल्या कुटुंबासोबत गावी गेला होता. तिथे त्याने घराच्या साफसफाईच्या बहाण्याने मोलकरणीला बोलावलं. तिथे मोलकरणी सोबत अनैतिक संबंध ठेवताना अनुने दोघांना पकडलं होतं. आपलं कृत्य उघड झाल्यानंतर चवातळलेल्या गौतमने अनुला निदर्यतेने मारहाण केली होती. त्यावेळी कसातरी स्वत:चा जीव वाचवून अनू शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी पळाली होती. आपल्या माहेरी फोन लावून तिने सर्व सांगितलं होतं. यानंतर गौतमची क्रूरता अजून वाढली.

त्याचा एक्सेस तिच्या मोबाइलमध्ये होता

भावाच्या सांगण्यावरुन अनुने स्वत:च्या घरात सीसीटीव्ही सुद्धा बसवले होते. त्याचा एक्सेस तिच्या मोबाइलमध्ये होता. सीसीटीव्हीमुळे गौतम मीणा मारहाण करणार नाही असं अनुचं मत होतं. पण त्यातूनही बचावाचा रस्ता शोधून गौतम मीणा अनुला मारहाण करायचा. या सगळ्याचा खुलासा मुलांनी आईच्या मृत्यूनंतर केला. नवरा-बायकोमधील सततच्या भांडणामुळे अनुने हे पाऊल उचललं असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. अनुच्या मुलाने मामा नीरजला अनुचा मोबाइल चेक करायला सांगितलं. त्यावेळी ते सीसीटीव्ही फुटेज पाहून सगळेच हैराण आहेत. त्यानंतर FIR नोंदवला.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान