दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली है, E20 धोरणावर राहुल गांधी यांची जोरदार टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या ई-२० पेट्रोल धोरणावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर ई-२० पेट्रोल पॉलिसीवरुन जोरदार टीका केली आहे.त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणात,’ दाल में कुछ काला नही, बल्की पूरी दाल ही काली है ! राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एका कारचा पेट्रोल टँक खोलून जनतेला या समस्ये संदर्भात बोलताना दिसत आहेत. त्यांनी या व्हिडीओत सरकारची ई-२० पेट्रोल पॉलिसीही दाल में कुछ काला ही नही, बल्की पूरी दाल काली है ! असे म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करीत सरकारवर टीका केली आहे, या व्हिडीओत ते पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या ई-२० पेट्रोल धोरणावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडीओत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की E20 पेट्रोल हा मुद्दा कोणताही छोटे प्रकरण नाही. तर मोठा इश्यू आहे. त्यांनी आरोप केला ही या ई-२० इंधनाने लोकांची कारचे इंजिन आणि स्कूटर खराब होत आहेत. यामुळे सर्वसामान्याच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. आणि लोकांच्या खिशावर थेटपणे दरोडा टाकला जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की या बदलाने जनतेच्या खिशावर अतिरिक्त ओझे सरकार टाकत आहे. परंतू यापासून सामान्य माणसाचा कोणता फायदा होत आहे याची कोणतेही स्पष्ट उत्तर दिले जात नाहीए.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की देशात यावेळी भ्रष्टाचाराचे इतके मुद्दे आहे की कोणत्या बाबींवर आधी बोलायचे याचा निर्णय घेणे अवघड बनले आहे. या प्रकरणाची सीक्वेंसिंग कशी करायची हे कळत नाहीए. काँग्रेस नेत्याने लोकांना स्पष्ट केले की जनतेने चिंता करण्याची गरज नाही. कारण या एका मुद्याला आपण उचलू आणि सरकारला यावर घेरु असे म्हटले आहे.
हरदीप सिंह पुरी यांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात चालू असलेल्या इथेनॉल ब्लेंडिंग वादावर तिखट प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की भारताचा बायोफ्युअल ब्लेंडिंग प्रोग्रॅम शानदार पद्धतीने पुढे चालला आहे. आणि काही लोक विनाकारण यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या टीकेला उत्तर देताना पेट्रोल पंपावर रोज सुमारे ६ ते ७ कोटी ग्राहक इंधन भरण्यासाठी येतात. जर कोणत्या वस्तूत भेसळीचा समस्या असती तर भेसळ कशातही होऊ शकते. खाण्याचे पदार्थ, श्वासातून जाणारी हवा असो किंवा केरोसिन किंवा डिझेल असो अशा कशातही भेसळ होऊ शकते.
सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांना रोज सुमारे २००० पेट्रोल पंप हरदीप सिंह पुरी यांनी आकड्यांचा हवाला देत सांगितले की सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. सुमारे २००० पेट्रोल पंपांचा सँपल घेतले आहे. देशभरातील १०७,००० हून अधिक पेट्रोल पंपांचे सँपल घेतले आहे. तपासणीत केवळ चार जागी समस्या आढळली आहे.
रोज कोट्यवधी लोक पेट्रोल पंपावर येत आहेत. काही एक प्रकरणाचा आधार बनवून हवा उभी करणे चुकीची आहे. केंद्रीय मंत्र्याने स्पष्ट केले की काही लोक राजकीय फायद्यासाठी संपूर्ण माहिती न घेता या प्रकरणाचा गैरफायदा घेत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला आहे. सरकार पर्यावरण संरक्षण आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाला संपूर्ण पारदर्शकतेसोबत काम करत आहेत.
E20 पेट्रोल वाद काय ?
वास्तविक, सरकार देशात प्रदुषण कमी करण्यासाठी आणि कच्चे तेलाची आयातीवरील निर्भरता घटण्यासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिक्स करत आहे. ज्याला E20 पेट्रोल म्हटले जात आहे. मात्र, विरोधक आणि वाहनचालकांनी या E20 पेट्रोलने जुन्या गाड्यांचे इंजिन खराब होत आहे. कारचे मायलेज देखील कमी होत आहे. या मुद्यावर आता राजकारण तापले आहे.
येथे पोस्ट वाचा –
E20 – दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है। pic.twitter.com/Unw7UfNt9k
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2026